तिरोडा उपजिल्हा रूग्णालयास आनंदीबाई जोशी पुरस्कार

By admin | Published: March 11, 2017 12:21 AM2017-03-11T00:21:03+5:302017-03-11T00:21:03+5:30

दरवर्षी जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रुग्णालयासाठी जिल्हा परिषदेतर्फे डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार दिला जातो.

Anandibai Joshi Award for Thiroda Sub-District Hospitalality | तिरोडा उपजिल्हा रूग्णालयास आनंदीबाई जोशी पुरस्कार

तिरोडा उपजिल्हा रूग्णालयास आनंदीबाई जोशी पुरस्कार

Next

५० हजारांचा धनादेश : जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे रूग्णालय
गोंदिया : दरवर्षी जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रुग्णालयासाठी जिल्हा परिषदेतर्फे डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार दिला जातो. सन २०१६-१७ साठी सदर पुरस्कार जि.प. गोंदियाच्या सभागृहात बुधवारी (दि.८) प्रदान करण्यात आला. यात तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयाला प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी जि.प. गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय तिरोडाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिम्मत मेश्राम यांना ५० हजार रूपयांचा धनादेश, सन्मानपत्र व मानचिन्ह देवून प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला जि.प. अध्यक्षा उषा मेंढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम, शिक्षण सभापती पी.जी. कटरे, महिला व बाल कल्याण सभापती विमल नागपुरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे यांची उपस्थिती होती.
उल्लेखनिय म्हणजे तिरोडा उपजिल्हा रुग्णालयास सदर आनंदीबाई जोशी पुरस्कार पाचव्यांदा मिळालेला आहे. विशेष म्हणजे याचवर्षी कायाकल्प योजनेंतर्गत राज्यातून उत्कृष्ट रुग्णालयाचा पुरस्कार दिल्ली येथील एम्स सभागृहात तिरोडा उपजिल्हा रूग्णालयास मिळाला आहे. कार्यक्रमात महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचा सन्मान करण्यात आला.
सदर उपजिल्हा रुग्णालयास मिळालेल्या पुरस्कारांमध्ये येथील कार्यरत विभागाच्या तत्परतेचा व कार्यकुशलतेचाही सहभाग असतो. यामध्ये आयुष विभाग, एएनसी क्लिनीक, सीटीसी विभाग, मलेरिया व फायलेरिया विभाग, टेलीमेडीसीन केंद्र, आरबीएसके कार्यक्रम, आयसीटीसी विभाग, मैत्री क्लिनिक, कुष्ठरोग विभाग, आरएनटीसीपी विभाग यांचा मोलाचा वाटा आहे. (प्रतिनिधी)

आणखी मिळणार सुविधा
तिरोडा उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात रूग्णांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच रूग्णालयाच्या विकासासाठी अदानी फाऊंडेशनचे सहकार्य लाभत आहे. शासन व अदानी फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने रूग्णांसाठी आणखी अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

Web Title: Anandibai Joshi Award for Thiroda Sub-District Hospitalality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.