ओवारा प्रकल्प ठरला शेतकºयांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 09:48 PM2017-10-23T21:48:38+5:302017-10-23T21:48:58+5:30

देवरी तालुक्यातील ओवारा गावाजवळील नाल्यावर सिंचन विभागाने बंधारा तयार केला. परिणामी दीड हजार हेक्टरमधील शेतीला सिंचनाची सोय झाली.

Boar gift to farmers for Ovara project | ओवारा प्रकल्प ठरला शेतकºयांसाठी वरदान

ओवारा प्रकल्प ठरला शेतकºयांसाठी वरदान

googlenewsNext
ठळक मुद्देदीड हजार हेक्टरला सिंचन : पिके वाचविण्यास मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देवरी तालुक्यातील ओवारा गावाजवळील नाल्यावर सिंचन विभागाने बंधारा तयार केला. परिणामी दीड हजार हेक्टरमधील शेतीला सिंचनाची सोय झाली. त्यामुळे हा प्रकल्प परिसरातील शेतकºयांसाठी वरदान ठरत आहे.
ओवारा गावाजवळील नाल्यावर बंधार तयार करण्याचे काम सिंचन विभागातर्फे मागील दोन वर्षांपासून सुरू होते. आता हे काम जवळपास संपले आहे. या बंधाºयामुळे परिसरातील शेतकºयांच्या शेतापर्यंत यंदा पाणी देखील पोहचले. त्यामुळे या प्रकल्पाकडून शेतकºयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
या प्रकल्पाची सिंचन क्षमता २४०० हेक्टरची असून प्रत्येक्षात २००० हेक्टरला सिंचनाचे नियोजन सिंचन विभागाने केले आहे. १९८५ मध्ये या प्रकल्पाची किंमत १ कोटी ७८ लाख रुपये होती. त्यानंतर आता प्रकल्प ५० कोटी ५३ लाख रुपयांवर पोहचला आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर ५० कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण झाल्यावर सिंचन क्षमतेत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे परिसरातील शेतकºयांना खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात पाणी देणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाकरिता २४० हेक्टर जमिन शेतकºयांकडून तर वन विभागाची १२९.८० हेक्टर जमिन घेण्यात आली. प्रकल्पामुळे बाधीत होणाºया गावांचे पुनर्वसन दुसºया ठिकाणी करण्यात आले आहे.
प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात
ओवारा प्रकल्पाचे मातीकाम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. तर नहराचे ११.५४ कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. वडद आणि कटंगटोला या लघु प्रकल्पाचे देखील लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे सिंचन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
शेतकºयांना झाली मदत
यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वच पिके धोक्यात आली होती. दरम्यान या प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी मिळाल्याने शेतकºयांना पिके वाचविण्यास थोडीफार मदत झाली.

Web Title: Boar gift to farmers for Ovara project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.