तुमच्या हाता-पायाला मुंग्या तर येत नाहीत, दुर्लक्ष केल्यास बेतेल जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 03:58 PM2024-05-15T15:58:15+5:302024-05-15T15:59:23+5:30

नियमित व्यायाम गरजेचा : लकव्याची लक्षणे, तात्काळ उपचार घेणे आवश्यक

Dont ignore the signs of Guillain-Barré syndrome | तुमच्या हाता-पायाला मुंग्या तर येत नाहीत, दुर्लक्ष केल्यास बेतेल जीवावर

Dont ignore the signs of Guillain-Barré syndrome

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची:
जीबीएस (गुलियन बॅरी सिंड्रोम) हा दुर्मीळ आजार असून यात हात-पाय लुळे पडण्यासारखी लक्षणे दिसतात. याकडे थोडेसे दुर्लक्ष केले तरीही ते जिवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच निदान, योग्य उपचार व आरोग्यदायी जीवनशैलीतून या संकटावर मात करता येणे शक्य आहे.


वयाच्या दीड वर्षानंतर बाळातील चालण्यात किंवा हात-पाय हलवण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्यास म्हणजे वेळीच जीबीएसवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे. साधारणतः हा आजार कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. अंग दुखणे, चालताना तोल जाणे, चेहरा सुजणे, चावताना व गिळताना त्रास होणे, हात-पाय लुळे पडणे, अशी लक्षणे दिसून येतात, तर या आजाराचे प्रमाण लहान बाळामध्ये अधिक दिसून येत असून बुलियन बॅरी सिंड्रोम एक वेगाने प्रगतिशील पॉलिन्यूरोपॅथी आहे ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात.


संशयास्पद रुग्णांसाठी इलेक्ट्रो मायोग्राफी आणि सीएसएफ विश्लेषण यासारख्या इलेक्ट्रोडायग्नोस्टिक उपचार करण्याचा सल्ला तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे या आजारा संदर्भातील लक्षणे आढळल्यानंतर तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे हितावह आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास या आजारातून सावरणे कठीण होते. यामुळे कायमचे अपंगत्व तसेच जीवालाही धोका होण्याची शक्यता असते.


ही आहेत या आजाराची लक्षणे?
● हातापायाला मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे आणि • डोळे किंवा चेहऱ्याची हालचाल करण्यास त्रास होणे यासारख्या लक्षणांबद्दल सतर्क राहणे गरजेचे आहे.
● मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात, फुफ्फुस आणि श्वासनलिकेवरही हल्ला करत रुग्णाची अवस्था पक्षघात म्हणजे लकवा झाल्यासारखी होते.


काय आहे जीबीएस? 
वायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे तसेच लसीकरणानंतर काही जणांना जीबीएस हा आजार झाल्याचे आढळले आहे. हाता- पायाच्या नसा कमजोर होतात. रोगप्रतिकार क्षमता हळूहळू कमी होत जाते. पक्षघात म्हणजेच लकवा वात अशा प्रकारचे आजार जळू शकतात. साधारणतः हे आजार लसीकरणानंतर अधिक प्रमाणात आढळल्याचे दिसून आले आहे.


उपचाराने टळेल धोका
जीबीएस किंवा एआयडीपी या आजारावर आयव्हीआयजी हे इंजेक्शन देणे महत्त्वाचे आहे. हे इंजेक्शन महागडे असून तीन दिवसांच्या आत दिल्यास रुग्णांवरील धोका टळतो. मात्र, हे उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीमध्येच हिताचे ठरते, असे तज्ज्ञांचे मत आहे.


हात-पाय लुळे पडण्याचीच लक्षणे नाही तर बाकी अवयवावर सुद्धा या आजाराचा प्रभाव पडू शकतो. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हे होऊ शकते; परंतु याचे प्रमाण वयाच्या दीड वर्षावरील बालकांमध्ये अधिक आढळून येते. त्यामुळे वेळीच योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन जीबीएसची चाचणी करून उपचार घेणे हितावह आहे.
- डॉ. नरेंद्र खोबा, वैद्यकीय अधिकारी, कोरची

Web Title: Dont ignore the signs of Guillain-Barré syndrome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.