बोरगावात पिण्याच्या पाण्याची टंचाई
By admin | Published: May 6, 2017 12:56 AM2017-05-06T00:56:33+5:302017-05-06T00:56:33+5:30
शिलापूर ग्रामपंचायत येथील वॉर्ड क्र.१ मध्ये मागील महिनाभरापासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
गावातील बोअरवेल बंद : गावकऱ्यांची भटकंती
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव (डवकी) : शिलापूर ग्रामपंचायत येथील वॉर्ड क्र.१ मध्ये मागील महिनाभरापासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.दोन बोअरवेल बंद अवस्थेत पडलेल्या असल्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
उन्हाळा येताच ग्रामीण भागात पाणी पेटू लागते. त्यानुसार येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये मागील एक महिन्यापासून पाणी टंचाईर् निर्माण झाली आहे. वॉर्डातील दोन बोअरवेल बंद पडून आहे. त्यामुळे वॉर्डवासीयांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. दुसरीकडे बोअरवेल आहे. पण त्या बोअरवेलचे पाणी गढूळ निघत आहे. ज्या बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य आहेत त्या ठिकाणी खुप गर्दी असते. नंबर लावण्यासाठी एकमेकासोबत हरेरावी होते. याकडे ग्रामपंचायत ही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. गावातील लोकांनी खेमराज राऊत, घनशाम गावराने, सेसराम, व्यंकट गावराने, विनोद काळसर्पे, पुरुषोत्तम राऊत, प्रेमलाल भोयर, भोजराज ठाकरे यांनी या बोअरवेल दुरुस्तीसाठी प्रयत्न केले मात्र पाईप नसल्यामुळे त्या बोअरवेल त्याच अवस्थेत बंद पडल्या आहेत.
गावातील लोकांनी ग्राम पंचायत सदस्यांना याबाबत सुचना दिली. मात्र आतापर्यंत बोअरवेल ज्या अवस्थेत आहेत त्याच अवस्थेत दिसून येत आहेत. मात्र ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. ग्राम पंचायत सदस्यांना गावातील लोकांनी पुन्हा विनंती केली पण त्यांनी पंचायत समिती देवरी येथे बोअरवेल पाईप नसल्यामुळे ही बोअरवेल दुरुस्त होऊ शकणार नाही असे सांगितले. या लेटलतीफीमुळे मात्र गावकरी पाण्यासाठी भटकत आहेत.