शेतकºयाला समृद्ध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:44 AM2017-10-28T00:44:52+5:302017-10-28T00:45:05+5:30

जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सहकार तत्वावरील आठ धान गिरण्या कार्यरत आहेत. या धान गिरण्या जीर्णावस्थेत आहेत.

Farmers will enrich it | शेतकºयाला समृद्ध करणार

शेतकºयाला समृद्ध करणार

Next
ठळक मुद्देसुभाष देशमुख : कामठा येथील शिवशंकर सहकारी धान गिरणीला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. सहकार तत्वावरील आठ धान गिरण्या कार्यरत आहेत. या धान गिरण्या जीर्णावस्थेत आहेत. त्यांना आर्थिक मदत करुन जुन्या भात गिरण्यांना पुनरुज्जीवित करून जिल्ह्यातील शेतकºयांना समृद्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
एका कार्यक्रमाकरिता ते गुरुवारी (दि.२७) रोजी गोंदिया येथे आले होते. या वेळी कामठा येथील श्री शिवशंकर सहकारी धान गिरणीला भेट दिली. या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी पालकमंत्री राजकुमार बडोले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जि.प. अध्यक्ष रजनी नागपुरे, माजी आ. हेमंत पटले, भैरिसंह नागपुरे, आ. डॉ. अनिल बोंडे उपस्थित होते.
देशमुख पुढे म्हणाले, शेतकºयांचे उत्पादन खर्च कमी करून त्यांचे उत्पादन वाढले पाहिजे, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहिला पाहिजे यासाठी शासन कटिबध्द आहे. शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी सहकार क्षेत्र वाढले पाहिजे, यासाठी सहकार विभाग शेतकºयांच्या पाठीशी आहे. शेतकºयांच्या सहकार्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यात सहकारी संस्था आहेत. परंतु त्यांच्याकडे स्वत:चे गोडावून नाही. यासाठी सहकारी संस्थांना गोडावून देण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षाही बडोले यांनी व्यक्त केले.
देशमुख यांनी कामठा येथील श्री शिवशंकर सहकारी धान गिरणीला भेट दिली. त्यानंतर गोंदिया शहरा जवळील पिंडकेपार येथील हरिओम मॉडर्न राईस मिललादेखील भेट दिली. नगर परिषद गोंदिया मोक्षधाम येथे सुध्दा भेट देवून पाहणी केली व उपस्थितांशी चर्चा केली.
या वेळी अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, अपर तहसीलदार के.डी. मेश्राम, जि.प. सदस्य विजय लोणारे, सरपंच निलेश कुंभरे, विनोद अग्रवाल, धान गिरणीचे अध्यक्ष टिकाराम भाजीपाले, रेखलाल टेंभरे उपस्थित होते.

Web Title: Farmers will enrich it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.