एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 09:59 PM2018-04-16T21:59:44+5:302018-04-16T21:59:44+5:30

NRHM activists stopped work | एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच

एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच

Next
ठळक मुद्देआरोग्य सेवेवर परिणाम : कंत्राटी कर्मचारी १२ वर्षांपासून वनवासातच

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी १० एप्रिलपासून अकराऐवजी सहा महिन्यांच्या पुर्ननियुक्ती आदेश देण्याच्या निर्णया विरोधात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका कर्मचाºयांनी घेतली आहे. बुधवारपासून (दि.११) हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून सोमवारी (दि.१६) आंदोलनाचा सहावा दिवस होता.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात करण्यात येत असलेल्या आंदोलनात जिल्हाभरातील कर्मचारी सहभागी झाल्याने त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम पडत आहे. आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्तांनी राज्यातील अधिकारी कर्मचाºयांना पुढील पुर्ननियुक्तीचे आदेश केवळ सहा महिन्यांचे देण्यात यावे. तसेच पुर्ननियुक्ती आदेश देण्याकरिता कामावर आधारीत गुणानुक्रमाचा वापर करण्यात यावा, असे आदेश दिले आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सेवा देणाºया राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे बुधवारपासून (दि.११) जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे देऊन कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे ६९१ कंत्राटी कर्मचारी असून हे सगळे अधिकारी-कर्मचारी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात संघटीत होऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सुनिल तरोणे, अर्चना वानखेडे, संकेत मोरघरे, संजय दोनोडे, सपना खंडाईत, डॉ. मीना वट्टी, सारनाथ बोरकर, अजित सिंग, ग्रीस्मा वाहने, प्रतिमा मेश्राम, संजय मेंढे, अ‍ॅड. रेखा कानतोडे, प्रणीता भोयर, ठनेंद्रसिंग येडे, संतोष डिब्बे, अर्चना चौधरी, राखी प्रसाद, रेखा पुराम, अर्चना कांबळे, प्रदीप रहांगडाले, ललीता गौतम, उषा जगताप, निशांत बन्सोड, अनिरूध्द शर्मा, अनिल रहमतकर, प्रकाश थोरात, पंकज रहांगडाले, निश माखीजा, मनिष मदने, सतीश माटे, मनोज सातपुते, अविनाश व्हराडे, विद्या रहांगडाले, माया नागपुरे, हर्षल अंबुले, गुणवंता कटरे यांचा समावेश आहे.

Web Title: NRHM activists stopped work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.