आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:35 AM2018-04-11T00:35:08+5:302018-04-11T00:35:08+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील पंचशिल बौद्ध स्मारक समितीच्यावतीने १४ व १५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील पंचशिल बौद्ध स्मारक समितीच्यावतीने १४ व १५ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यांतर्गत, १४ तारखेला सकाळी ९ वाजता भंते नंद यांच्या हस्ते ध्वजारोहण व वंदना, ११.३० वाजता धम्म उपदेश, दुपारी ३ वाजता शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता बुद्ध वंदना व ७.३० वाजता सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात येतील. तर १५ तारखेला सकाळी ७ वाजता बुद्ध वंदना, ९ वाजता धम्म शांतता रॅली, ११ वाजता भीम जयंती मेळावा व रात्री ९ वाजता गायक संभाजी ढगे (चंद्रपूर) यांचा समाज प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमाला पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार गोपालदास अग्रवाल, राज्य काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष नाना पटोले, जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी, आमदार संजय पुराम, माजी आमदार राजेंद्र जैन, जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर, बसप नगरसेवक पंकज यादव, किसान आघाडीचे मनोहर चंद्रीकापुरे, संस्थापक अजय लांजेवार, प्रा. सविता बेदरकर, जि.प. सदस्य सरिता कापगते, रत्नदीप दहिवले, जि.प. सदस्य उषा शहारे, माजी सदस्य मिलन राऊत, माजी सभापती राजेश नंदागवळी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.