थकीत वेतन भत्ते द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:27 AM2018-04-08T00:27:06+5:302018-04-08T00:27:06+5:30

थकीत वेतन भत्ते देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या जिल्हाव्यापी आंदोलनांतर्गत येथील पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला.

Pay salaries to the tired | थकीत वेतन भत्ते द्या

थकीत वेतन भत्ते द्या

Next
ठळक मुद्देग्रा.पं. कर्मचाऱ्यांची मागणी : पंचायत समितीवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : थकीत वेतन भत्ते देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जिल्हाव्यापी आंदोलनांतर्गत येथील पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान विस्तार अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या वेळी दिलेल्या निवेदनातून थकीत वेतन भत्ता मिळणे, भविष्य निर्वाह निधी खात्यात एकूण वेतनावर ८.३३ टक्के रकम जमा करणे, सेवाशर्तीचे पालन करणे, तक्रार निवारणाच्या सभा घेणे, आॅनलाईन वेतन प्रक्रिया पूर्ण करणे, विमायोजना लागू करणे आदि मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाºयांनी पंचायत समितीवर मोर्चा काढला. याप्रसंगी मागण्यांना घेऊन विस्तार अधिकार बंसोड यांच्यासोबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. तसेच त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावर विस्तार अधिकारी बंसोड यांनी ग्रामसेवकांना बोलावून त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले.
या आंदोलनात प्रामुख्याने सुरेश रंगारी, मोरेश्वर फुंडकर, देवचंद बारापात्रे, रावेंद्र किरे, ऋषीपाल डोेंगरे, नरेंद्र शहारे, सागर बिसेन, किशोर नागपूरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बीडीओंच्या कार्यप्रणालीवर रोष
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मोर्चा पंचायत समितीवर धकडला असता तेव्हा बिडीओ जावेद इमानदार कार्यालयात नव्हते. यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रश्नांवर मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येते तेव्हा बीडीओ पळवाटा काढतात व कार्यालयात राहत नाही. अनेकदा कर्मचाºयांच्या प्रश्नांवर शिष्टमंडळाच्या माध्यमाने चर्चा करायची असते तेव्हा बीडीओ कार्यालयातून बाहेर जातात असे ग्रामपंचायत कर्मचाºयांचे म्हणणे आहे. यावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बीडीओ यांच्या या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला. तसेच याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मिलिंद गणवीर यांनी यावेळी दिला.

Web Title: Pay salaries to the tired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.