कत्तलखान्यात जाणाऱ्या २६ गार्इंचे प्राण वाचविले
By admin | Published: July 31, 2015 01:59 AM2015-07-31T01:59:53+5:302015-07-31T01:59:53+5:30
छत्तीसगडमधून ककोडी मार्गाने नागपूरकडे कत्तलखान्यात नेत असलेल्या २६ गाई असलेल्या ट्रकला बजरंग दला...
बजरंग दलाचा पुढाकार : चिचगड पोलिसांची कारवाई
देवरी : छत्तीसगडमधून ककोडी मार्गाने नागपूरकडे कत्तलखान्यात नेत असलेल्या २६ गाई असलेल्या ट्रकला बजरंग दला देवरीच्या कार्यकर्त्यांनी चिचगड पोलिसांच्या सहकार्याने गुरूवारी सकाळी ६ वाजता गणुटोला गावाजवळ पकडले. त्यामुळे २६ गार्इंचे प्राण वाचू शकले.
छत्तीसगडवरून ट्रकमध्ये (सीजी ०७/सीए-७८८६) एकूण २६ गाई भरून ककोडी मार्गाने नेत असल्याची माहिती देवरी येथील बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली. त्यांनी याची माहिती चिचगड पोलिसांना दिली. चिचगड पोलिसांच्या सहाय्याने बजरंग दलच्या कार्यकर्ते मोनू शाहू, मोनू ठाकूर, दीपक शहारे, राजू श्रीभद्रे व इतर कार्यकर्त्यांनी गणुटोला गावाजवळ सदर ट्रक पकडले. चिचगड पोलिसांनी ट्रक चालक जितेंदरसिंग (रा. यशोदानगर, एकता कॉलनी, नागपूर) याला अटक केली व त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात गोहत्या बंदी असतानासुद्धा छत्तीसगडवरून महाराष्ट्रात विविध मार्गाने गाई व बैलांना कत्तलखान्यात नेण्यात येत आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. पोलिसांचे कार्य बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना करावे लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. गोहत्या तसेच गाय, बैल व म्हशींच्या परिवहनावर बंदी असूनही पोलीस प्रशासनासमोर दरदिवशी शेकडो गाई, म्हशी कत्तलखान्याकडे नेण्यात येत आहेत. परंतु यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)