शाळेच्या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 10:29 PM2017-12-04T22:29:30+5:302017-12-04T22:29:47+5:30
शाळेच्या जीर्ण इमारतीचा काहीे भाग कोसळल्याची घटना सोमवारी (दि.४) रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील शिवनी येथे घडली.
आॅनलाईन लोकमत
आमगाव : शाळेच्या जीर्ण इमारतीचा काहीे भाग कोसळल्याची घटना सोमवारी (दि.४) रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तालुक्यातील शिवनी येथे घडली. मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवीत हाणी झाली नसून विद्यार्थी थोडक्यात बचावल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील शिवणी येथे जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे. या शाळेची इमारत फारच जुनी व जीर्ण झालेली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता शाळेच्या पटांगणावर विद्यार्थ्यांची प्रार्थना सुरू असताना शाळेच्या इमारतीचा एक भाग कोसळला. सुदैवाने इमारतीचा भाग कोसळला त्या परिसरात विद्यार्थी किंवा शिक्षक नसल्याने मोठी जीवीत हाणी टळली. दरम्यान या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शिवनी शाळेची जीर्ण झालेली इमारत पाडण्याबाबत २१ आॅगस्ट २०१७ रोजीच्या बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. ग्रामपंचायतने सर्व कागदपत्रांची पूर्तत: करुन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याची वेळीच दखल घेवून जीर्ण झालेली इमारत त्वरीत न पाडल्यास या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांनी दिला आहे.