जि.प. आरोग्य विभाग मद्यपी कर्मचाऱ्याच्या दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 09:03 PM2018-05-14T21:03:03+5:302018-05-14T21:03:15+5:30

जिल्हा परिषद आरोग्य विभागातील महिला कर्मचारी सध्या एका मद्यपी कर्मचाऱ्याच्या त्रासाने दहशतीत आहेत. नेहमीच मद्यप्राशन करून येणे, महिला कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करणे, कर्मचाऱ्यांना धमकविण्याचा प्रकारामुळे त्रस्त होवून महिला कर्मचाऱ्यांनी याची तक्रार जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी एम. राजा. दयानिधी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या प्रकाराने जि.प.च्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Zip Department of Health, Alcohol Inspector | जि.प. आरोग्य विभाग मद्यपी कर्मचाऱ्याच्या दहशतीत

जि.प. आरोग्य विभाग मद्यपी कर्मचाऱ्याच्या दहशतीत

Next
ठळक मुद्देमहिला कर्मचाऱ्यांची सीईओंकडे तक्रार : शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील महिला कर्मचारी सध्या एका मद्यपी कर्मचाऱ्याच्या त्रासाने दहशतीत आहेत. नेहमीच मद्यप्राशन करून येणे, महिला कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करणे, कर्मचाऱ्यांना धमकविण्याचा प्रकारामुळे त्रस्त होवून महिला कर्मचाऱ्यांनी याची तक्रार जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी एम. राजा. दयानिधी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या प्रकाराने जि.प.च्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
येथील जि.प. आरोग्य विभागात कनिष्ठ सहायक या पदावर एक कर्मचारी विनंती बदलीने रूजू झाला. रूजू झाल्यापासून कार्यालयात नेहमीच मद्यप्राशन करुन येत असल्याचा आरोप महिला कर्मचाऱ्यांचा आहे. मद्यप्राशन करून आल्यानंतर कार्यालयात गोंधळ घालणे. महिला कर्मचाºयांविषयी अपशब्दांचा वापर करणे. अश्लील भाषेत शिव्या देण्याच्या प्रकारामुळे कार्यालयातील महिला कर्मचारी त्रस्त असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे या संदर्भात कुणीही तक्रार केल्यास त्यांना पाहून घेण्याची धमकी सुध्दा सदर कर्मचाºयाने दिल्याने याबाबत आतापर्यंत कुणीही लेखी तक्रार करण्यास पुढे आले नव्हते. मात्र वरिष्ठांना वेळोवेळी यासंदर्भात कल्पना देण्यात आली. आरोग्य विभागात कार्यरत कार्यालयीन एक वरिष्ठ अधिकारी सुध्दा सदर कर्मचाºयासोबत मद्यप्राशन करून कार्यालयात राहून मद्यपी कर्मचाºयाला अभय देत असल्याचे सीईओंना दिलेल्या तक्रारीतून म्हटले आहे. दरम्यान या मद्यपी कर्मचाºयाने ७ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आरोग्य विभागात कार्यरत एका महिला कर्मचाºयाचा १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही बाब कैद झाली आहे. याबाबत रितसर अर्ज केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरीचा प्रकार व सीसीटीव्ही फुटेजबाबत सदर कर्मचाऱ्याला कळवून मोबाईलची मागणी करण्यात आली. परंतु सीसीटीव्ही फुटेजच खोटे असल्याचे सांगून हा कर्मचारी थेट सुट्ट्यांवर निघून गेल्याचे म्हटले आहे.
कार्यालयात मद्य प्राशन करून येवून धिंगाणा घालणाऱ्या, कार्यालयीन शिस्त व शांतता भंग करणाºया या कर्मचाºयाने मोबाईलचा गैरवापर केला तर, या विचारानेच सदर महिला कर्मचाऱ्याला मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान आरोग्य विभागात कार्यरत संबंधीत दोन्ही कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी केली आहे. या कर्मचाऱ्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्याची परवानगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागीतली आहे.
महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्चचिन्ह
कर्मचाऱ्यांची संख्या कमी, त्यातच कामाचा अधिक भार असल्याने जिल्हा परिषदेत अनेक महिला कर्मचारी कार्यालयीन वेळेनंतरही काम करीत राहतात. वास्तविकत: महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतरही काम करावयाचे असल्यास त्यांच्या सुरक्षेची हमी विभाग प्रमुखांनी घेण्याचा शासन निर्णय आहे. याशिवाय महिलांना होणाऱ्या त्रासाबाबत प्रत्येक कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती नेमण्याचे सुद्धा निर्देश आहेत. असे असताना सुद्धा थेट कार्यालयात मद्य प्राशन करून येणे, महिलांना अश्लील शिवीगाळ करण्याच्या या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीला केराची टोपली
सदर मद्यपी कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना त्यांनी कर्मचाºयांचे जास्तीचे ऐरियस बिल काढले. मात्र कर्मचाºयांच्या खात्यात कमी रक्कम टाकून सुमारे पाच लाख रूपयांचा अपहार केला असल्याची तक्रार खुद्द तिगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात कायदेशिर कार्यवाहीची मागणी करण्यात आली. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या या तक्रारीलाच केराची टोपली दाखविण्यात आल्याची माहिती आहे.

सदर मद्यपी कर्मचाऱ्यांसंदर्भात महिला कर्मचाऱ्यांची तक्रार प्राप्त झाली आहे. सीईओंच्या निर्देशानुसार या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांच्याकडे सोपविली आहे. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
-डॉ.श्याम निमगडे
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.गोंदिया.

Web Title: Zip Department of Health, Alcohol Inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.