कलिंगड खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 03:06 PM2018-04-07T15:06:08+5:302018-04-07T15:06:08+5:30
अनेकजण उन्हाळ्यात कलिंगड खाण्याला प्राधान्य देतात. वरुन टणक दिसणा-या कलिंगडात पाणीच पाणी असतं.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत कलिंगड हे फळ लोकप्रिय आहे. कलिंगड गोड आणि थंड असल्याने अनेकजण उन्हाळ्यात कलिंगड खाण्याला प्राधान्य देतात. वरुन टणक दिसणा-या कलिंगडात पाणीच पाणी असतं. त्यामुळे उन्हाळ्यात ते आवर्जून खायला हवं. पण या कलिंगडाचे आणखीही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तेच आज आपण जाणून घेऊया.
1) कलिंगडामध्ये लायकोपिन असतं, याने त्वचेची चमक कायम राहते.
2) हृदयासंबंधी समस्या रोखण्यासाठी कलिंगड हे रामबाण उपाय आहे. कलिंगड कोलेस्टॉल लेव्हल कमी करतं. ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांपासून सुटका होऊ शकते.
3) कलिंगडात व्हिटामिन ए असतं आणि व्हिटामिन ए डोळ्यांसाठी चांगलं असतं.
4) कलिंगड खाल्ल्याने डोकं शांत राहतं आणि चिडचिड कमी होते.
5) कलिंगडाच्या बीयाही उपयोगी असतात. या बीयाचं पावडर करुन ते चेह-यावर लावल्यास त्वचा चमकदार होते. तसेच याचा लेप डोके दु:खीवर चांगला उपाय आहे.
6) कलिंगडाचे नियमीत सेवन केल्यास पोटाचा त्रास कमी होतो. तसेच रक्ताची कमतरता असेल तर कलिंगडाचा रस फायदेशीर ठरतो.
7) कलिंगड चेह-यावर तावल्यास चेहरा ताजातवाणा होते आणि ब्लॅकहेड्सही दूर होतात.