आयुर्वेदाला ‘अच्छे दिन’, आयुष मंत्रालयानं देशभरात ‘पेन मॅनेजमेंट थ्रू आयुर्वेद’ला दिली चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 04:00 AM2017-10-22T04:00:05+5:302017-10-22T04:00:22+5:30

'Good Day' to Ayurveda, Ayush Mantralaya Launched 'Pain Management Through Ayurveda' across the country | आयुर्वेदाला ‘अच्छे दिन’, आयुष मंत्रालयानं देशभरात ‘पेन मॅनेजमेंट थ्रू आयुर्वेद’ला दिली चालना

आयुर्वेदाला ‘अच्छे दिन’, आयुष मंत्रालयानं देशभरात ‘पेन मॅनेजमेंट थ्रू आयुर्वेद’ला दिली चालना

googlenewsNext

- आमोद काटदरे
भारतातील पुरातन वैद्यकीय शास्त्र असलेल्या आयुर्वेदाने कात टाकली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आयुष मंत्रालयाची केलेली स्थापना त्यात मोलाची ठरली. धन्वंतरी जयंतीच्या दिवशी मोदी यांनी पहिल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे लोकार्पण केले. याच कार्यक्रमात त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आयुर्वेद रुग्णालय उभारण्याची गरजही व्यक्त केली. एवढ्यावरच मर्यादित न राहता आयुर्वेदाचे सध्या अकॅडमिक, रिसर्च, फार्मसी, क्लिनिक अशा चार मोलाच्या टप्प्यांवर व्यापक काम सुरू आहे. देशभरात सध्या ‘पेन मॅनेजमेंट थ्रू आयुर्वेद’ अर्थात वेदनाशमनावर सामान्य नागरिक व शिकाऊ वैद्यांना व्याख्याने दिली जात आहेत. त्याचाच पुढचा भाग म्हणून ‘डायबिटीस फ्री इंडिया’ अर्थात मधुमेहमुक्त भारतावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. एकंदरीत आयुर्वेद शास्त्र, त्यातील बदलांबाबत राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त डोंबिवलीतील ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. विजयुकमार पोंक्षे, अस्थी- सांधे व मणक्यांचे विकाराचे वैद्य डॉ. मंगेश देशपांडे, औैषधनिर्माण व वंध्यत्वावर उपचार करणारे डॉ. संकल्प घरत आणि औषध वितरक विजय सोहनी यांनी टाकलेला दृष्टिक्षेप...
अ‍ॅलोपथीच्या तुलनेत उशिराने येणारा गुण त्याचबरोबर चूर्ण, लेप, काढे आणि विशेषत: पथ्य पाळायला लागत असल्याने मध्यंतरी सहजासहजी आयुर्वेदाचे उपचार कोणी घेत नसत. मात्र, अ‍ॅलोपथीचे साइडइफेक्ट किंवा त्यामुळे होणारी शारीरिक हानी यामुळे रुग्ण किंवा नागरिकांचा आयुर्वेदाकडे ओढा वाढत आहे. नैसर्गिक वनस्पती, जडी-बुटींपासून बनवलेली औषधे अथवा नैैसर्गिक घटक असलेल्या उत्पादनांच्या खरेदीवर भर दिला जात आहे. वाढते मार्केटिंगही त्याला तितकेच कारणीभूत असल्याचे म्हणता येईल. आयुर्वेदाच्या क्षेत्रात विविध पातळ््यांवर कार्यरत असलेली मंडळी, वैद्य, कंपन्या, संशोधक यांनी सध्याच्या गरजा लक्षात घेत आवश्यक ते बदल स्वीकारले आहेत. त्यामुळे आयुर्वेदशास्त्र पुरातन असले, तरी त्याची व्याख्या काळानुरूप बदलते आहे. चूर्ण, लेप, काढे यातून कात टाकत सध्याच्या गरजा लक्षात घेत औषध देण्याच्या पद्धतीतही बदल झाले आहेत. आता चूर्णाऐवजी सुटसुटीत गोळी अथवा काढ्याऐवजी सिरपही मिळते आहे.
कफ, वात, पित्त शरीर प्रकृती यावर आयुर्वेदाचे मूळ आधारित आहे. कफ प्रवृती लहान वयात असते. कारण या वयात शरीर घट्ट, धडधाकट असते. वात प्रकृती तरुण वयात असते. हे वय सळसळते असते, तर पित्त प्रकृती ही उतारवयात असते. या काळात शरीर थंड, तब्येतीने बारिक असते. कफ प्रकृतील रुग्णांना मधाच्या माध्यमातून, पित्त प्रकृतीच्या रुग्णांना तूप, वात प्रकृतीच्या व्यक्तींना तेलाच्या माध्यमातून आयुर्वेदिक औषधे दिली जातात. इमर्जन्सीमध्ये कधीही अ‍ॅलोपथी उपचारपद्धती सर्वश्रेष्ठ आहे. परंतु, त्यातून प्रकृती सुधारायला लागताच आयुर्वेदिक औषधे घेतली पाहिजेत. या औषधांमुळे विलंबाने गुण येत असला; तरी तो कायमस्वरूपी असतो. कोणत्याही पॅथीच्या औषधांबरोबर पथ्य पाळणे ही रुग्णाची सर्वात मोठी जबाबदारी आहे. अ‍ॅलोपथीच्या औषधांत रासायनिक घटक असतात. अनेकदा ही औषधे स्ट्राँग असल्याने ती उष्ण पडतात. त्यामुळे औषधे घेताना पथ्य न पाळताच मसालेदार पदार्थांवर ताव मारल्यास त्याची अ‍ॅलर्जी अथवा विपरित परिणाम होतो. सर्दी-खोकला झाला असताना एकीकडे औैषधांचा डोस घेताना दुसरीकडे आईस्क्रीम अथवा थंड पदार्थ खाल्ल्यास कसा गुण येईल? त्यामुळे कोणत्याही पॅथीच्या डॉक्टरांनी रुग्णाला औैषधे देताना पथ्य पाळण्याचा सल्ला आवर्जून द्यायला हवा.
भारतातील निरनिराळे प्रांत-प्रदेश, ऋतू, हवामान याचबरोबर त्यानुसार तेथे पिकणारे धान्य, वनस्पती, जडीबुटी याचे महत्त्व आयुर्वेदात विषद करण्यात आले आहे. पूर्वीच्या काळी घराच्या परसदारी हमखास तुळस, गवती चहा, कोरफड, अडुळसा आदी वनस्पती असत. सर्दी-खोकला झाल्यास घरातील मंडळी त्यापासून काढा देत असत. पोटदुखीसाठी ओवा, त्यापासून बनवलेला ओवा अर्क, तर गॅस-अपचनासाठी हिंगाष्टक चूर्ण वगैरे हमखास घेतली जात. गावागावांमधील वैैदू, वैैद्य मंडळी औषधे देताना काढा, चूर्ण आदी तत्सम औषधे देत. अनेकदा काही औषधांची प्रक्रिया घरी बनवायला सांगत असत. वर्षभरासाठी मोरावळा, आवळा पाक आदी प्रकार घरच्या घरी तयार केले जात. परंतु, काळाच्या ओघात प्रशस्त बैठ्या घरांच्या जागी उंची इमारती उभ्या राहिल्या. दुसरीकडे काढा-अर्क घरी बनवण्यासाठी वेळही कुणाकडे नाही. त्यामुळे आयुर्वेदाकडे अनेकांनी पाठ फिरवली. नागरीकरण किंवा हवामानाच्या बदलांमुळे अनेक औषधी वनस्पतीही आता दुर्मिळ झाल्या आहेत. आयुर्वेदिक औषधे महाग असण्याचे त्यामागील हेही एक कारण आहे. आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी आता अशा वनस्पतींची शेती करण्याची वेळ ओढवली आहे.
साधारणपणे आयुर्वेदात चूर्ण (पावडर), काढा आणि अर्क अशा तीन प्रकारांत औैषधे दिली जातात. चूर्ण प्राथमिक तर अर्काची सर्वांत शेवटच्या टप्प्यातील औषधाची वर्गवारी करता येईल. आयुर्वेदिक औैषधे नैैसर्गिक घटकांपासून बनवली जात असल्याने त्यावर विविध पद्धतीने प्रक्रिया करावी लागते. पूर्वी वैद्य अनेक औषधे स्वत: घरी बनवत असत. त्यासाठी तेवढा वेळ, मनुष्यबळ आणि साहित्यही त्यांच्याकडे उपलब्ध होते. आजही अनेक वैद्यांकडे प्रशिक्षित कामगार आहेत. ते स्वत: हातांनी विविध प्रकारच्या गोळ््या बनवतात. त्या गोळ््यांचा आकार, वजन सारखेच असते. पण हातांनी बनवलेल्या गोळ््या तुलनेने मऊ असतात. या गोळ््या शरीरात लगेच विरघळतात. वाढती बाजारपेठ आणि मागणी विचारात घेता अनेक कंपन्यांनी संशोधन करून चांगल्या प्रतीच्या गोळ््या बाजारात आणल्या आहेत. एरंडेल तेलाऐवजी आता गोळी उपलब्ध आहे. गोमूत्रापासून बनवलेली गोळीही मिळते. ती देखील गुणकारी आहे. पण अनेकदा गोळ््या बनवताना त्यांसाठी बाइंडिग केले जात असल्याने त्या अधिक कडक असतात. त्यामुळे त्यांचे सेवन केल्यास त्या शरीरात लगेचच पूर्णपणे विरघळतीलच, असे नाही. त्यामुळे एका गोळीपासून अपेक्षित शंभर टक्के गुण येत नाही. शिवाय औषधे टिकावीत, यासाठी रंग, स्वाद तसेच ती दीर्घकाळ टिकावीत यासाठीही विविध घटक घालावे लागतात.
आयुर्वेदिक औैषधे ही आॅरगॅनिक तर अ‍ॅलोपॅथीची औषधे रसायनांपासून बनवलेली असल्याने इनआॅरगॅनिक प्रकारची असतात. आयुर्वेदिक औषधांचा गुण चांगला येतो. उदाहरण द्यायचे झाल्यास हरणाच्या शिंगांपासून बनवलेल्या मृगशृंग भष्मापासून कॅल्शियम मिळते. रासायनिक कॅल्शियमपेक्षा ते अधिक गुणकारी असते. पण हरणाच्या शिकारीवर इतकेच नव्हे तर मृत हरणाचे शिंगही औषधासाठी वापरण्यावर निर्बंध आहेत. त्याचा परिणाम औषधनिर्मितीवर होतो आणि पर्याय शोधावे लागतात.
घराच्या बागेतील तुळशीपासून आपण घरी अर्क अथवा काढा बनवल्यास तो अधिक शुद्ध आणि पूर्णपणे गुणकारी ठरू शकतो. आयुर्वेदिक औैषधांच्या किमती व्यावसायिक स्वरूपामुळेही महाग आहेत. सध्या अनेक औैषधांच्या जाहिरातींवरही कंपन्या खर्च करतात. शिवाय रुग्णही सरार्सपणे परस्पर अशी औैषधे घेतात. ते घातक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औैषधे घ्यायला हवीत.
>कात टाकण्यास सुरुवात
आयुर्वेदाने आता कात टाकायला सुरुवात केली आहे. जगभरात विविध पातळ्यांवर संशोधन सुरू आहे. दुर्मीळ वनस्पतींची आता पत्र्याच्या डब्यात लागवड केली जाते. त्याला इंडस्ट्रियल फार्मिंग असे म्हणतात. नैैसर्गिक शेतीपेक्षा त्यात अनेक तोटे आहेत. पण हा बदल आता आयुर्वेेदाने स्वीकारला आहे. भारतापेक्षा जपानसारखे देश यात आघाडीवर आहेत. चीनमध्ये जागोजागी त्यांच्याकडील आयुर्वेदिक दुकाने आहेत. तेथे रुग्णांना सकाळ, सायंकाळी काढ्यासारखा पदार्थ पिण्यासाठी बोलावले जाते. मोठ-मोठ्या गाड्यांमधून रुग्ण, नागरिक येऊन तो पितात. त्यामुळे ती औषधे, त्यांचा प्रसार होतो आहे. वाढतो आहे. आयुष मंत्रालयामुळे आयुर्वेदाला बळकाटी मिळाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोफत उपचार करणारे आणि २४ तास खुले असणारे आयुर्वेदिक दवाखाने व रुग्णालये सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सध्या देशभरात आयुर्वेदातून वेदनाशमन अर्थात ‘पेन मॅनेजमेंट’वर सर्वसामान्य नागरिक आणि आयुर्वेदाचे शिक्षण घेणाºयांना धडे दिले जात आहेत. त्यासाठी आयुष मंत्रालयाने देशभरातील विविध ठिकाणी डॉक्टरांची समिती नेमली आहे. या समितीमधील डॉक्टरांचा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आढावाही घेतला जातो. लवकरच मधुमेहमुक्त भारतासाठी मोहीम राबवली जाणार आहे. जागतिक पातळीवरही दर दोन वर्षांनी आयुर्वेदासंबंधी परिषद घेतली जात आहे. त्यात आयुर्वेदाचे संशोधन, उपाचारपध्दती आदी पातळ्यांमधील कामांबाबत आढावा घेतला जातो. आता तर भारतातील मेडिक्लेम पुरवणाºया कंपन्याही आयुर्वेदिक उपचार घेणाºया रुग्णांचे विमा दावेही मंजूर करत आहेत.
>सामान्यांना दिलासा
डोंबिवलीत एमआयडीसीतील गणपती मंदिराशेजारच्या रुग्णालयात आयुर्वेदाचे विनामूल्य उपचार केले जातात. मंगळवार ते शनिवारी दुपारी २ ते ४ दरम्यान विविध डॉक्टर तेथे उपचार करतात. त्याचबरोबर पश्चिमेला रेल्वे स्थानकासमोर नाख्ये उद्योग

Web Title: 'Good Day' to Ayurveda, Ayush Mantralaya Launched 'Pain Management Through Ayurveda' across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य