कोणत्या लोकांनी चुकूनही पिऊ नये हळदीचं दूध? होऊ शकतं गंभीर नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 09:36 AM2023-04-26T09:36:36+5:302023-04-26T09:40:07+5:30

Who Should Not Drink Turmeric Milk: हळदीचं दूध काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आम्ही सांगणार आहोत की, हळदीच्या दुधाचं सेवन कोणत्या लोकांनी करू नये.

Health Tips : Who should not drink turmeric milk | कोणत्या लोकांनी चुकूनही पिऊ नये हळदीचं दूध? होऊ शकतं गंभीर नुकसान

कोणत्या लोकांनी चुकूनही पिऊ नये हळदीचं दूध? होऊ शकतं गंभीर नुकसान

googlenewsNext

Who Should Not Drink Turmeric Milk: बालपणापासून आपण ऐकत आलो असतो की, दूध आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. थकवा किंवा कमजोरी वाटली तर दुधाचं सेवन करावं. इतकंच नाही तर हळदीचं दूध प्याल तर जास्त फायदा होतो हेही सगळ्यांना माहीत आहे. पण अनेकांना हे माहीत नाही की, हळदीचं दूध काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आम्ही सांगणार आहोत की, हळदीच्या दुधाचं सेवन कोणत्या लोकांनी करू नये.

कुणी पिऊ नये हळदीचं दूध?

किडनीच्या रूग्णांनी

जर तुम्ही किडनीशी संबंधित आजाराने ग्रस्त असाल तर तुम्ही हळदीचं दूध पिणं टाळलं पाहिजे. कारण हळदीमध्ये ऑक्सालेट असतं जे किडनीशी संबंधित आजारांना ट्रिगर करतं. तुमची समस्या वाढू शकते. त्यामुळे जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर किंवा इतर कोणती समस्या असेल तर हळदीचं दूध टाळावं.

लो ब्लड शुगरचे रूग्ण

हळदीच्या दुधाचं सेवन लो ब्लड शुगर असलेल्या लोकांनी करू नये. कारण हळदीमध्ये करक्यूमिन असतं जे ब्लड शुगर लेव्हल आणखी कमी करतं. ज्यामुळे स्थिती बिघडू शकते. इतकंच नाही तर तुम्हाला इतरही अनेक समस्यांचाही सामना करावा लागू शकतो.

रक्ताची कमी असेल तेव्हा

हळदीच्या दुधाचं सेवन केल्याने शरीरात आयरनचं अवशोषण बाधित होतं. ज्यामुळे शरीरात हीमोग्लोबिनचा स्तर वाढत नाही. तेच अशात जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही हळदीच्या दुधाचं सेवन करू नये.

पचनक्रिया व्यवस्थित नसणारे

जर तुम्हाला पचनासंबंधी समस्या असेल जसे की, पोटात गॅस, ब्लोटिंग, सूज, छातीत जळजळ किंवा अॅसिड रिफल्क्स, बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी असेल तर तुम्ही हळदीचं दूध पिऊ नये. याने तुमची पोटाची समस्या वाढू शकते. 

Web Title: Health Tips : Who should not drink turmeric milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.