एका वर्षात कॅन्सर नष्ट करणाऱ्या औषधाचा शोध, संशोधकांनी केला दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 10:07 AM2019-02-01T10:07:49+5:302019-02-01T10:16:08+5:30

कॅन्सर एक असा आजार आहे ज्याच्या जाळ्यात अडकलं जर जीवन संपलं असं मानलं जातं. आजही या जीवघेण्या आजारावर ठोस असा उपाय समोर आलेला नाहीये.

Israeli scientists claim cancer cure medicine cure for cancer within a year | एका वर्षात कॅन्सर नष्ट करणाऱ्या औषधाचा शोध, संशोधकांनी केला दावा!

एका वर्षात कॅन्सर नष्ट करणाऱ्या औषधाचा शोध, संशोधकांनी केला दावा!

googlenewsNext

(Image Credit : infodomicile.com)

कॅन्सर म्हणजेच कर्करोग एक असा आजार आहे ज्याच्या जाळ्यात अडकलं जर जीवन संपलं असं मानलं जातं. आजही या जीवघेण्या आजारावर ठोस असा उपाय समोर आलेला नाहीये. काही ठराविक केसेसमध्ये व्यक्ती यातून बाहेर पडतो. पण पुन्हा त्यांना कॅन्सर आपल्या जाळ्यात घेण्याचीही शक्यता असते. अनेक प्रकारच्या सर्जरी आणि कीमोथेरपीच्या मदतीने कॅन्सरवर उपचार करता येतात, पण कॅन्सर मुळातून नष्ट होण्याचं प्रमाण फार कमी आहे. 

कॅन्सरबाबत जगभरात सतत वेगवेगळे शोध सुरू असतात. असाच एका शोध इस्त्राइलच्या संशोधकांनी केला आहे. या शोधात त्यांनी दावा केला आहे की, ते कॅन्सरला नष्ट करणारं असं औषध तयार करू शकतात, ज्याने कॅन्सर एका वर्षात होऊ शकतो. 

बायोटेक कंपनी AEBi चा दावा

तसे तर कॅन्सरवर वेगवेगळे उपाचार केले जातात. पण हा आजार मुळातून नष्ट करण्याचा दावा कुणीच करत नाही. पण इस्त्राइलच्या अॅक्सिलेरेटेड इवॉल्यूशन बायोटेक्नॉलॉजी लिमिटेड (AEBi) कंपनीने हा दावा केला आहे. त्यांनी दावा केलाय की, कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराला ते पूर्णपणे दूर करू शकतात. 

या शोधात दावा करण्यात आला आहे की, बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आणि पेप्टाइड्सच्या मदतीने कॅन्सरला नष्ट करणारं औषध तयार करण्यात आलं आहे. पेप्टाइट्सला अमीनो अ‍ॅसिडचं रूप मानलं जातं. सध्या या शोधात तयार करण्यात आलेलं औषध मनुष्यावर वापरण्यात आलेलं नाहीये. शोधादरम्यान या औषधाचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला होता. त्यावरून हा दावा करण्यात येत आहे. पण या दाव्यावर इतर संशोधकांनी टिका केली आहे. 

दरवर्षी १.८ कोटी लोकांना कॅन्सर

कंपनीने दावा केला आहे की, या औषधाचा आणि उपचाराचा उंदरांवर यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. आता याचा प्रयोग मनुष्यावर केला जाईल. त्यानंतर हे औषध पुढील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये मार्केटमध्ये उपलब्ध होईल. दरवर्षी कॅन्सरचे १ कोटी ८० लाख नवीन केसेस समोर येत आहेत. 

याआधीही इस्त्राइलमधील संशोधकांनी एड्सवर उपचाराचं औषध शोधल्याचा दावा केला होता. पण याबाबत पुढे काही खास झालं नाही. एका मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित बातमीनुसार, संशोधकांनी दावा केला होता की, त्यांनी एक असं औषध तयार केलं आहे ज्याने एचआयव्ही एड्सच्या पेशी नष्ट केल्या जाऊ शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे इस्त्राइलच्या संशोधकांनी या औषधाचं पेटेंट करण्याचाही प्रयत्न केला होता.

Web Title: Israeli scientists claim cancer cure medicine cure for cancer within a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.