जास्तीत जास्त लोक केस धुतांना करतात 'ही' चूक, तुम्हीही करता का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 02:03 PM2024-05-09T14:03:14+5:302024-05-09T14:04:01+5:30

रॉक्सी हेअर सलून एक्सपर्टने सांगितलं की, केस जास्त काळ स्वच्छ ठेवण्यासाठी दोन वेळा शाम्पू केलं पाहिजे.

Most people make this mistake while washing their hair, do you too? | जास्तीत जास्त लोक केस धुतांना करतात 'ही' चूक, तुम्हीही करता का?

जास्तीत जास्त लोक केस धुतांना करतात 'ही' चूक, तुम्हीही करता का?

लोक केस धुण्यासाठी वेगवेगळ्या शाम्पूचा वापर करतात. शाम्पूने केस धुतले तर ते चांगले स्वच्छ होतात. केसांमधील धूळ, कोंडा निघून जातो. तसेच काही शाम्पूने केसांना पोषणही मिळतं. सोशल मीडियावरही केस धुण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स दिल्या जातात. नुकताच एका एक्सपर्टने दावा केला की, जास्तीत जास्त लोक केस धुताना चूक करतात.

रॉक्सी हेअर सलून एक्सपर्टने सांगितलं की, केस जास्त काळ स्वच्छ ठेवण्यासाठी दोन वेळा शाम्पू केलं पाहिजे. डबल शाम्पू केल्याने केसांची खोलवर स्वच्छता होते. जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल तर तो दूर करण्यासाठी जास्त स्वच्छतेची गरज असते त्यामुळे दोनदा शाम्पू करावं. आधी शाम्पूने केसांमधील घाण निघून जाते आणि दुसऱ्यांदा शाम्पूने डोक्याची त्वचा स्वच्छ होते.

दुसऱ्यांदा शाम्पूने डोक्यांची त्वचा स्वच्छ करायची आहे केस नाहीत. त्यानंतर केस मुलायम आणि चमकदार करण्यासाठी केसांवर हेअर मास्क किंवा कंडीशनरचा वापर करा. डबल शाम्पू करणं सगळ्यांसाठी गरजेचं आहे. जे लोक कोंडा आणि डोक्याच्या खाजेमुळे हैराण आहेत त्यांनी दोनदा शाम्पू करायला हवं. असं केल्याने केसांच्या मुळापासून स्वच्छता होते.

कुणी करावं डबल शाम्पू?

सगळ्या प्रकारच्या केसांना दोनदा शाम्पू करण्याची गरज असते. याने केसांना जास्त फायदा मिळतो. जे कुणी आठवड्यातून एकदा केस धुतात त्यांना डबल शाम्पूने फायदा मिळतो. जे लोक रोज किंवा दर दुसऱ्या दिवशी केस धुतात त्यांनी डबल शाम्पू करण्याची गरज नाही. हे यावर अवलंबून असतं की, तुम्ही किती वेळा केस धुता.

कसा करावा वापर

आधी आपले केस चांगले ओले करा, नंतर हातांवर थोडं शाम्पू घ्या आणि केसांच्या मुळांपर्यंत लावा. नंतर बोटांनी 1 मिनिट डोक्याची मालिश करा आणि नंतर केसांवरही हलक्या हाताने शाम्पू लावा. ओले केस कमजोर असतात त्यामुळे ते खेचू नका. पाण्याने चांगले धुवा. हेच पुन्हा करा.

काय करू नये?

दिवसातून दोनदा कधीच शाम्पू करू नये. केस जास्त वेळा धुतल्याने त्यांमधील नॅचरल ऑइल निघून जातं आणि यामुळे केसगळतीची समस्या होते. 

Web Title: Most people make this mistake while washing their hair, do you too?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.