हिंगोली जिल्ह्याला तुषारचे १४ कोटी अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:39 AM2018-01-15T00:39:02+5:302018-01-15T00:39:53+5:30

जिल्ह्यातील ठिबक आणि तुषार सिंचन खरेदी केलेल्या चार हजार शेतक-यांसाठी ७ कोटी रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. तर तेवढेच अनुदान वाटप करण्यात येणार आहे.

 14 crores grant for sprinkalar irrigation for Hingoli district | हिंगोली जिल्ह्याला तुषारचे १४ कोटी अनुदान

हिंगोली जिल्ह्याला तुषारचे १४ कोटी अनुदान

googlenewsNext
ठळक मुद्देआॅनलाईनमुळे बोगस शेतक-यांना चाप


लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली/वारंगाफाटा : जिल्ह्यातील ठिबक आणि तुषार सिंचन खरेदी केलेल्या चार हजार शेतक-यांसाठी ७ कोटी रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. तर तेवढेच अनुदान वाटप करण्यात येणार आहे.
ठिबक आणि तुषार सिंचन संच खरेदीत खूप मोठ्या प्रमाणात बोगस अनुदान लाटण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे शासनाने सदर अनुदान आॅनलाईन प्रणालीद्वारे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही अंशी बोगस लाभार्थ्यांना चाफ बसला आहे. यंदा २०१७ -१८ या वर्षात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून हिंगोली जिल्ह्यासाठी ठिबक आणि तुषार सिंचन अनुदानासाठी एकूण १४ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. १० हजार ९०६ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केलेली आहे. त्यापैकी ३ हजार ९३८ लाभार्थी शेतकºयांना ६९३ लक्षरुपये अनुदान वाटप केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी दिली. यात औंढा तालुक्यातील १ हजार ५८८ शेतक-यांनी आॅनलाईन केलेल्यांपैकी ७०७ लाभार्थी शेतक-यांना १०७ लक्ष तर वसमत तालुक्यातील २ हजार ८२९ शेतक-यांनी आॅनलाईन केल्यापैकी ७०६ शेतक-यांना १८५.३१ लक्ष रुपये, हिंगोली तालुक्यातील १ हजार ६९९ शेतक-यांनी आॅनलाईन केल्यापैकी ७१७ शेतक-यांना ९८ लक्ष रुपये आणि कळमनुरी तालुक्यातील ३ हजार १८५ शेतक-यांनी आॅनलाईन केले त्यापैकी ९७३ शेतक-यांना १९५. लक्ष रुपये,तर सेनगाव तालुक्यातील १ हजार ६०५ शेतक-यांनी ठिबक आणि तुषार सिंचन संचाचे अनुदान मिळण्यासाठी आॅनलाईन केले. त्यापैकी ८३८ शेतक-यांनी संच खरेदी करुन अनुदानासाठी प्रस्ताव सादर केला. त्यांच्यासाठी १०६. लक्ष रुपये अनुदान वाटप केल्याची माहिती लोखंडे यांनी दिली आहे.

अनेक शेतक-यांचे अनुदान रद्द
आॅनलाईन केलेल्या १०९०६ अर्जांपैकी १००० शेतक-यांचे कागदपत्रे अपूर्ण किंवा संच खरेदी न केल्यामुळे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. यावर्षी जवळपास अजून तेवढीच रक्कम उर्वरित शेतक-यांना अनुदानापोटी अदा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली. तर पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत शेतक-यांनी आॅनलाईन केल्यास पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतक-यांनी सदरील ठिबक आणि तुषार संच खरेदी करून बिल आॅनलाईन अपलोड करून सादर प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावा.

Web Title:  14 crores grant for sprinkalar irrigation for Hingoli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.