‘आरटीई’ अंतर्गत ५९ शाळांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:12 AM2018-02-04T00:12:25+5:302018-02-04T00:12:27+5:30

वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी दरवर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी खासगी शाळांची आॅनलाईन नोंदणी केली जाते. शिक्षणाधिकाºयांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ५९ शाळांनी नोंदणी केली आहे.

 59 schools under 'RTE' enrollment | ‘आरटीई’ अंतर्गत ५९ शाळांनी केली नोंदणी

‘आरटीई’ अंतर्गत ५९ शाळांनी केली नोंदणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वंचित व दुर्बल घटकांतील मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी दरवर्षी आरटीई २५ टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी खासगी शाळांची आॅनलाईन नोंदणी केली जाते. शिक्षणाधिकाºयांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ५९ शाळांनी नोंदणी केली आहे.
विद्यार्थ्यांना पहिली प्रवेशासाठी इंग्रजी शाळांना ‘आरटीई’ २५ अंतर्गत टक्के आॅनलाईन नोंदणी बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाºयांनी शाळेची आॅनलाईन नोंदणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या कालावधीत ५९ शाळांनी नोंदणी केली आहे. आता शासनाकडून सूचना येताच विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रीयेस सुरूवात केली जाणार असल्याचे सर्व शिक्षाचे प्रशांत भगत यांनी सांगितले. प्रवेश पात्रतेसाठी विद्यार्थ्यांचे वय, यामध्ये ३० सप्टेंबर २०१८ रोजी वयोमर्यादा ५ वर्ष ८ महिन्यापेक्षा अधिक व ६ वर्ष ११ महिन्यापर्यंत असावे. प्रवेश प्रक्रीयेसाठी आॅनलाईन अर्ज स्विकृतीस प्रारंभ झाला नाही. शासनाकडून आदेश मिळताच याबाबत शिक्षण विभागास सूचना दिल्या जाणार आहेत.
गतवर्षी आरटीई २५ टक्केच्या हिंगोली जिल्ह्याला ५१२ जागा मिळाल्या होत्या. चालू शैक्षणिक वर्षात यंदा जिल्ह्यासाठी ६९२ जागा वाढविण्यात आल्या आहेत. आरक्षित प्रवेशाच्या संख्येत वाढ करण्यात आल्याने याचा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. प्रवेशासाठी पालकांनी स्वत: आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहेत.

Web Title:  59 schools under 'RTE' enrollment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.