हिंगोली शालेय पोषण आहार योजनेत अनियमितता आढळल्यास कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 11:59 PM2018-01-05T23:59:41+5:302018-01-05T23:59:46+5:30
शालेय पोषण आहार योजनेत अनियमितता आढळल्यास तत्काळ कार्यालयीन कार्यवाही केली जाणार आहे. अनेक ठिकाणी तांदूळ पुरवठा नसल्यामुळे शाळेतील पोषण आहार बंद आहे. त्यामुळे याबाबत लवकरच माहिती मागविली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शालेय पोषण आहार योजनेत अनियमितता आढळल्यास तत्काळ कार्यालयीन कार्यवाही केली जाणार आहे. अनेक ठिकाणी तांदूळ पुरवठा नसल्यामुळे शाळेतील पोषण आहार बंद आहे. त्यामुळे याबाबत लवकरच माहिती मागविली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शिक्षणाधिकारी शिवाजी पवार सेवानिवृत्त झाल्याने हिंगोली प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार डी. के. इंगोले यांच्याकडे देण्यात आला आहे. ५ जानेवारी रोजी शिक्षणाधिकारी इंगोले यांच्याशी संवाद साधला असता यावेळी त्यांनी शालेय पोषण आहारात अनियमितता आढळून आल्यास कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले. यासह जिल्हा परिषदेच्या विविध शाळांच्या भेटी घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळेतील भौतिक सुविधा आदींची पाहणी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.