महावितरणपुढे ३ कोटी वसुलीचे आव्हानच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:42 AM2018-02-24T00:42:53+5:302018-02-24T00:42:56+5:30
महावितरणच्या शून्य थकबाकी मोहिमेअंतर्गत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक लघुदाब वीज ग्राहकांकडे सप्टेंबर २०१७ अखेर असलेल्या ४९ कोटी ५१ लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीपोटी नांदेड परिमंडळातील २४ हजार ३१२ वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित केला आहे. जिल्ह्यातील १ लाख १० हजार ३८८ वीजग्राहकांकडे ५ कोटी ७७ लाख थकबाकी आहे. त्यापैकी २ कोटी ४ लाख वसूल केले. उर्वरित रक्कम वसुलीसाठी महावितरणपुढे आव्हानच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महावितरणच्या शून्य थकबाकी मोहिमेअंतर्गत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक लघुदाब वीज ग्राहकांकडे सप्टेंबर २०१७ अखेर असलेल्या ४९ कोटी ५१ लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीपोटी नांदेड परिमंडळातील २४ हजार ३१२ वीजग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित केला आहे. जिल्ह्यातील १ लाख १० हजार ३८८ वीजग्राहकांकडे ५ कोटी ७७ लाख थकबाकी आहे. त्यापैकी २ कोटी ४ लाख वसूल केले. उर्वरित रक्कम वसुलीसाठी महावितरणपुढे आव्हानच आहे.
थकबाकी वसुलीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांनी वसुलीसाठी कंबर कसली आहे. त्यांच्या प्रयत्नांना यशही मिळत आहे. मोहीम सुरू करण्यात आली तेव्हापासून मागील १७ दिवसांत वीज ग्राहकांनी प्रतिसाद देत १२ कोटी ७३ लाखांचा वीज बिल भरणा केला. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ४७ हजार ९३५ वीज ग्राहकांनी ६ कोटी ८१ लाख, परभणी जिल्ह्यातील ६ हजार २१७ वीज ग्राहकांनी ३ कोटी ८८ लाख तर हिंगोली जिल्ह्यातील १० हजार ५८८ वीज ग्राहकांनी २ कोटी ४ लाख रूपये भरले आहेत. महावितरणची शून्य थकबाकी मोहीम जोरात सुरू असून कुठल्याही परिस्थितीत थकबाकी शून्य झालीच पाहिजे या ध्येयाने महावितरणमधील वरिष्ठ अधिकाºयांसह कर्मचारी परिश्रम घेत आहेत. ज्या वीजग्राहकांनी अद्याप थकीत रक्कम भरली नाही, त्यांनी तत्काळ महावितरणकडे बिलभरणा करण्याचे आवाहन केले.
वीजग्राहकांना आपल्या सोयीनुसार वीजबिल भरता यावे याकरिता वीजबिल भरणा केंद्रासोबतच विविध पयार्यांची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. इंटरनेट बँकींग, मोबाईल अॅप, पेटीएम, वेबसाईटव्दारे विजबिल भरले जात आहे. विशेष म्हणजे महावितरणची सर्व वीजबील भरणा केंद्र आता आॅनलाईन केल्याने कुठल्याही ग्राहकाला कुठेही बिल भरणा केंद्रावर वीज बिल भरता येणार आहे. महावितरणच्या सेवेबाबत अद्ययावत राहण्याकरिता वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.