हिंगोलीत केवळ तीनच तालुक्यांचे बोंड अळी पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 11:24 PM2018-01-07T23:24:13+5:302018-01-07T23:24:16+5:30
जिल्ह्यामध्ये कपाशीचे ५४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून, सेनगाव, औंढा आणि वसमत तालुक्याचे बोंड अळीचे पंचनामे झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यामध्ये कपाशीचे ५४ हजार ६०० हेक्टर क्षेत्र असून, सेनगाव, औंढा आणि वसमत तालुक्याचे बोंड अळीचे पंचनामे झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून मिळाली आहे.
जिल्ह्यामध्ये मागील पंधरा ते वीस दिवसांपासून प्रत्यक्ष शेतकºयांच्या शेतात जावून बोंड बळीचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण सुरु असले तरी अद्यापपर्यंत केवळ तीन तालुक्याचे पंचनामे पुर्णत्वास गेले आहेत. उर्वरित तालुकेही येत्या पाच ते सात दिवसात होण्याची शक्यता असल्याची ग्वाही कृषी अधीक्षक कार्यालयाकडून दिली जात आहे. हिंगोली ३ हजार २७७, सेनगाव ४ हजार ९५५, औंढा नागनाथ १० हजार १२८, कळमनुरी १३ हजार ७९९ आणि वसमत २२ हजार ६४६ असे एकूण ५४ हजार ६०० हेक्टर कपाशीचे क्षेत्र आहे. त्या- त्या तालुक्यातील गावात संबंधित पथकाने प्रत्यक्ष शेतात जावून सर्वे केला जात आहे. कपाशीचा फोटो अपलोड करुन सर्वेक्षण सुरु आहे. एकंदरीत पंचनामेच संथगतीने सुरु असून, येत्या काही दिवसांत पुर्ण होते की नाही ? हा एक प्रश्नच आहे. पंचनामे पुर्ण झाल्यानंतर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या स्वाक्षरीने अहवाल तहसीलदार, उपविभागीय अधिकाºयाकडे पाठविला जाणार आहे. नंतर परिपूर्ण अहवाल कृषी अधिक्षक कार्यालयाकडे पाठविल्यानंतर त्याची तपासणी करुन तो अहवाल जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येणार असल्याचे कृषि अधीक्षक विजय लोखंडे यांनी सांगितले.
बोंड अळीच्या सर्वेक्षणाची लांब लचक प्रक्रिया असुन, अजूनही ती आटोक्यातच आलेली नाही. त्यामुळे सर्वेक्षण होणार कधी आणि नुकसान कधी हाती पडेल याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे. नुकसानीमुळे कर्जाचा डोंगर वाढला आहे.
जिल्ह्यातील बोंड अळीचे सर्वेक्ष करण्याचा जलत गतीने करुन घेण्याच्या सुचना शासनातर्फे दिल्या होत्या. परंतु त्यासुचनाचे पालन न होता अजूनही संथगतीनेच सर्वेक्षण सुरुच असल्याचे चित्र आहे.