४ गावांत भूसंपादन ; १८ कोटींचा मावेजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:44 PM2017-12-02T23:44:03+5:302017-12-02T23:44:09+5:30
तालुक्यातील ८ गावातून राष्टÑीय महामार्ग ३६१ हा वर्धा- नांदेड जात आहे. चार गावातील काही शेतकºयांना उपविभागीय कार्यालयाकडून १८ कोटीचा मावेजा देण्यात आला आहे.
कळमनुरी : तालुक्यातील ८ गावातून राष्टÑीय महामार्ग ३६१ हा वर्धा- नांदेड जात आहे. चार गावातील काही शेतकºयांना उपविभागीय कार्यालयाकडून १८ कोटीचा मावेजा देण्यात आला आहे.
वर्धा- नांदेड या राष्टÑीय महामार्गात तालुक्यातील डोंगरकडा, वरुड, भाटेगाव, वारंगा फाटा, चुंचा, कुर्तडी, फुटाणा या आठ गावांच्या ५० ते ५५ हेक्टर जमिन जात आहे. या शेतकºयांची घरे, दुकाने, विहिर, बोअर, जमिनी जात आहेत. आठ गावातील शेतकºयांसाठी १०० कोटीच्या वर मावेजापोटी निधी लागणार आहे. येथील उपविभागीय कार्यालयात ३८ कोटीचा निधी आला आहे. त्यापैकी चार गावातील काही शेतकºयांना १८ कोटीची रक्कम आॅनलाईन त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. सहा गावांच्या जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे.
कुर्तडी येथील मोजणी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत ४ डिसेंबर व फुटाणा येथील मोजणी ११ डिसेंबरपासून करण्यात येणार आहे. डोंगरकडा, वरुड, भाटेगाव, वारंगा फाटा, चुंचा, भाटेगाव या सहा गावांच्या जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून अंतिम अधिसूचना, सुनावणी व निवाडेही झाले आहेत. वारंगा एक, भाटेगाव-५६, डोंगरकडा- ६५, वरुड-७२, या शेतकºयांना मोबदला देण्यात येत आहे. दररोज शेतकºयांच्या नावावर आॅनलाईन रक्कम जमा करण्यात येत आहे. या ३६१ राष्टÑीय महामार्गाच्या कामाला सुरूवातही झाली असल्याचे उपविभागीय कार्यालयातून सांगण्यात आले.
जमीन संपादनाअभावी हे काम रखडल्याचे सांगितले जात होते. तर शासनानेही या भूसंपदानाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास सांगितले होते. त्यामुळे या मार्गाच्या प्रत्यक्ष कामातील हा अडथळा यामुळे दूर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.