आक्षेपार्ह मजकूर; कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:34 PM2018-01-11T23:34:01+5:302018-01-11T23:34:09+5:30
येथील मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाºयावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी न.प. कर्मचारी संघटनेच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांना निवेदन देवून कर्मचाºयांनी भावना व्यक्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाºयावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी न.प. कर्मचारी संघटनेच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांना निवेदन देवून कर्मचाºयांनी भावना व्यक्त केल्या.
हिंगोलीत मागील काही दिवसांपासून स्वच्छ सर्वेक्षण अभियानात स्वच्छतेच्या कामांना गती आली आहे. मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिलेल्या हाकेला ओ देत कर्मचारीही अंग झटकून कामाला लागले आहेत. एवढेच नव्हे, तर पदाधिकारी व नगरसेवकांचाही या मोहिमेत सक्रिय सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे शहराचे चित्र बदलत आहे. एकाच दिवशी सर्व बदल होणार नसला तरीही शाश्वत बदलाकडे वाटचाल मात्र सुरू आहे. अवघी नगरपालिका बक्षीस मिळविण्याच्या आशेने झपाटल्यागत काम करीत असतानाच शे.अतिक नामक इसमाने फेसबूकवर शारीरिक व्यंगावर टिपण्णी केली. त्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
नगर परिषदेच्या कर्मचाºयांनीही आक्षेपार्ह मजकूर टाकणाºयावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्वच्छताविषयक तक्रारींसाठी नगरपालिकेने अॅपही तयार केले. त्याचा प्रचारही केला. अनेकांनी या अॅपवर तक्रारी केल्या. त्याची दखल घेवून स्वच्छतेची कामेही केली जात आहेत. मात्र तरीही जाणीवपूर्वक असे प्रकार करून अधिकारी व कर्मचाºयांचे मन विचलित करण्याचा प्रकार केला जात असून त्याचा निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले. यावर रघुनाथ बांगर, गजानन बांगर, विजय शिखरे आदींच्या सह्या आहेत.