फक्त ४ यंत्रांनी डास आटोक्यात येतील का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:20 AM2018-08-18T00:20:35+5:302018-08-18T00:22:20+5:30
जिल्ह्यातील मागील काही वर्षात डेग्ंयू आजाराने डोके वर काढले आहे. डासोत्पत्तीवर प्रतिबंध हाच साथीच्या गावात उपाय असून यासाठी हिवताप विभागाकडे केवळ ४ फवारणी यंत्रे आहेत. यावर्षी आतापर्यंत या विभागाने ८ गावांत फवारणी केली. जुलै आखेतपर्यत एकूण १६ हजार ९१३ रक्तनमुने घेण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील मागील काही वर्षात डेग्ंयू आजाराने डोके वर काढले आहे. डासोत्पत्तीवर प्रतिबंध हाच साथीच्या गावात उपाय असून यासाठी हिवताप विभागाकडे केवळ ४ फवारणी यंत्रे आहेत. यावर्षी आतापर्यंत या विभागाने ८ गावांत फवारणी केली. जुलै आखेतपर्यत एकूण १६ हजार ९१३ रक्तनमुने घेण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान असल्याने विविध ठिकाणी डबके साचून त्यावर डासांची उत्पत्ती होत आहे. शिवाय गाजर गवताचे स्तोम वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे अनेक गावांत तापासह इतर आजारांचे रुग्ण वाढत आहेत. काही ठिकाणी डेंग्यसदृश्य आजाराचे रुग्ण आढळत आहेत. अशावेळी उपाय योजना म्हणून डासांच्या निर्मूलनासाठी करावयाच्या पायराथ्रम औषध फवारणीच्या केवळ चारच मशिन हिवताप विभागाकडे उपलब्ध आहेत. दिवसेंदिवस या मशिनची संख्या कमीच होत चालली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मागणी करूनही या मशिनने फवारणी करण्यास वावच मिळत नाही. यंदा साथसदृश्य स्थिती असलेल्या आठ गावांमध्ये हिवताप विभागाने पायराथ्रम औषधाची फवारणी केली. यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यात कुंरजंळ, सूर्यवाडी, धारखेडा, सेनगाव तालुक्यात वाघजाळी, वसतम तालुक्यात महमंदपूरवाडीत दोनदा तर वीरेगाव, कोर्टा मिळून ८ गावांत ग्रा.पं.च्या मागणीनुसार फवारणी केली. जिल्हा हिवताप कार्यालयाकडून केवळ ४ मशिनवरच कसे भागते, यासंदर्भात विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी सांगितले की, प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या खर्चातून मशिन घेतल्यामुळे कमी पडत नाहीत. मागणीनुसार फवारणी केली जाते. त्यामध्ये मशिनच्या इंधनाचा खर्च त्या- त्या ग्रा.पं.ला द्यावा लागतो. ही फवारणी करण्याआगोदर आमच्या कार्यालयाकडूनकिटकसमरक म्हणून एक पथक असते. ते सर्व्हे करून डासांची घनता व तपासणी करून त्यावर उपाययोजना म्हणून फवारणी करणे, जळालेले आॅईल नालीत टाकणे, असे डास निर्मूलनाचे उपाय सुचविते.
डेग्ंयू हा डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. डेग्ंयूची लक्षणे तीव्र ताप येणे, डोकेदुखी, उलटी, अंगदुखी, डोळयात दुखणे, अंगावर लालसर येणे, तीव्र पोट दुखणे, रक्तस्त्राव होणे इत्यादीचे लक्षणे आहेत.
४डेग्ंयूवर उपचार म्हणून तापासाठी पॅरासिटामोल घेणे, भरपूर पाणी पिणे, विश्रांती घेणे आवश्यक असते. या रोगांवर नियंत्रणासाठी डास निर्मूलन करणे व सामान्य जनतेपर्र्यंत आरोग्य शिक्षणाचे धडे देणे महत्त्वाचे आहे.