नदी पुनरुज्जीवनासाठी दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:30 AM2018-03-19T00:30:54+5:302018-03-19T00:30:54+5:30
जिल्ह्यातील मुर्त होत चाललेल्या कयाधू नदी पुनरुज्जीवीत करण्याची लोक चळवळ जिल्ह्यात हाती घेण्यात येणार आहे. यासाठी ३ एप्रिल रोजी रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह हे हिंगोलीत येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील मुर्त होत चाललेल्या कयाधू नदी पुनरुज्जीवीत करण्याची लोक चळवळ जिल्ह्यात हाती घेण्यात येणार आहे. यासाठी ३ एप्रिल रोजी रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह हे हिंगोलीत येणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे व नदी पुनरुज्जीवीत करण्याबाबतचे नियोजन करण्यासाठी हिंगोली शहरातील महाविर भवन येथे २१ मार्च रोजी रात्री ८ वाजता सर्व समावेशक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कयाधू नदी लोक चळवळीतून पुनरुज्जीवीत करण्यात येणार आहे. ही मोहिम एक लोक चळवळ व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश व्हावा यासाठी डॉ.राजेंद्र सिह हे हिंगोलीत येवून मार्गदर्शन करुन पुढील दिशा देणार आहेत. सदर बैठकीस जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लोक चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन कयाधू नदी पुनरुज्जीवन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.