Hockey World Cup 2018 : न्यूझीलंडची विजयी सलामी, फ्रान्सचा उत्तम खेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 08:35 PM2018-11-29T20:35:56+5:302018-11-29T20:36:15+5:30
Hockey World Cup 2018: फ्रान्स आणि न्यूझीलंड हे उभय संघ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत प्रथमच समोरासमोर आले.
भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : फ्रान्स आणि न्यूझीलंड हे उभय संघ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत प्रथमच समोरासमोर आले. क्रमवारीत आघाडीवर असलेल्या न्यूझीलंडने अपेक्षेप्रमाणे खेळ करताना 'A' गटातील या सामन्यात 2-1 अशी बाजी मारली. 2013 नंतर या संघांमधील ही तिसरी आंतरराष्ट्रीय लढत होती आणि त्यात न्यूझीलंडने विजय मिळवून जय-पराजयाची आकडेवारी 2-0 अशी केली. उभय संघातील एक सामना बरोबरीत सुटला होता.
FT. New Zealand trumps France in an exciting encounter as the @BlackSticks won the match by a score line of 2-1. @FF_Hockey managed to garner a consolation goal in the dying minutes of the game. #NZLvFRA#IndiaKaGame#DilHockey#HWC2018pic.twitter.com/XPzBvVEoDM
— Hockey India (@TheHockeyIndia) November 29, 2018
न्यूझीलंड आणि फ्रान्स यांनी बचावात्मक खेळावर भर ठेवला. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर न्यूझीलंडने 17व्या मिनिटाला खाते उघडले. केन रसेलने अप्रतिम मैदानी गोल करताना संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चेंडूवर ताबा ठेवताना न्यूझीलंडने सावध खेळावरच भर दिला. फ्रान्सकडून आक्रमक खेळ झाला, परंतु त्यांच्या वाट्याला यश येत नव्हते. मात्र, त्यांनी न्यूझीलंडलाही 1-0 अशा फरकावरच बराच काळ रोखले होते.
🏑 | LIVE | Q3 ends without disturbing the scorecard and the scorer 😔
— Hockey World Cup 2018 - Host Partner (@sports_odisha) November 29, 2018
SCORE: 1-0#HWC2018#Odisha2018
🇳🇿 #NZLvFRA 🇫🇷 pic.twitter.com/EeysuZnoBm
न्यूझीलंडला दुसरा गोल करण्यासाठी अखेरच्या सत्रापर्यंत वाट पाहावी लागली. स्टीफन जेनेसने ( 56 मि.) मैदानी गोल करताना न्यूझीलंडला 2-0 अशी आघाडी मिळवून दिला. मात्र, 59 व्या मिनिटाला फ्रान्सने मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना सामन्यात चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. व्हिक्टर चार्लेटने हा गोल केला. पण, फ्रान्सचा पराभव टाळण्यासाठी तो पुरेसा ठरला नाही.
🏑 | LIVE | GAME-OVER! @BlackSticks finish after a last quarter fightback from @FF_Hockey but what a strong game it was from both teams! 👏🏼
— Hockey World Cup 2018 - Host Partner (@sports_odisha) November 29, 2018
SCORE: 2-1#HWC2018#Odisha2018
🇳🇿 #NZLvFRA 🇫🇷 pic.twitter.com/kEmCxlEm0D