विश्व हॉकी लीग : आॅस्ट्रेलियाने जेतेपद राखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:24 AM2017-12-11T01:24:53+5:302017-12-11T01:25:06+5:30

सामना संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना ब्लॅक गोव्हर्सने नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाचे कडवे आव्हान २-१ गोलने परतावले आणि हॉकी विश्व लीग स्पर्धेचे जेतेपद कायम राखले.

 World hockey league: Australia retains the title | विश्व हॉकी लीग : आॅस्ट्रेलियाने जेतेपद राखले

विश्व हॉकी लीग : आॅस्ट्रेलियाने जेतेपद राखले

Next

भुवनेश्वर : सामना संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना ब्लॅक गोव्हर्सने नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाचे कडवे आव्हान २-१ गोलने परतावले आणि हॉकी विश्व लीग स्पर्धेचे जेतेपद कायम राखले. कलिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अखेरच्या मिनिटात अर्जेंटिनाला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु, त्यातील एकही संधी त्यांना साधता आली नाही.
आॅस्ट्रेलियाकडून गोव्हर्स व्यतिरिक्त जेरेमी हॅवर्डने १७व्या मिनिटाला गोल केला. तसेच अर्जेंटिनाकडून आॅगस्टिन बुगालो याने १८व्या मिनिटाला गोल करत सामना १-१ असा बरोबरी ताणला होता. मध्यंतरापर्यंत ही बरोबरी कायम राहिली होती. दुसºया सत्रातही दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करत अखेरपर्यंत सामना समान स्थितीत ठेवला होता. परंतु, अंतिम क्षणी मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोव्हर्सने केलेला गोल निर्णायक ठरवताना कांगारुंनी बाजी मारली. (वृत्तसंस्था)

Web Title:  World hockey league: Australia retains the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.