म्यानमारमध्ये सैनिकांशी चकमकीत १२ ठार
By admin | Published: October 13, 2016 06:16 AM2016-10-13T06:16:15+5:302016-10-13T06:16:15+5:30
म्यानमारच्या उत्तरेकडे असलेल्या रखीन राज्यात सशस्त्र लोक आणि सैनिक यांच्यात मंगळवारी झालेल्या चकमकींत १२ जण ठार झाले
Next
यंगून : म्यानमारच्या उत्तरेकडे असलेल्या रखीन राज्यात सशस्त्र लोक आणि सैनिक यांच्यात मंगळवारी झालेल्या चकमकींत १२ जण ठार झाले. म्यानमार सरकारचे अधिकृत वृत्तपत्र ‘ग्लोबल न्यू लाईट आॅफ म्यानमार’ने बुधवारी हे वृत्त दिले आहे.
रखीन हे राज्य अशांत असून तेथे तणाव वाढत आहे. चकमकीत चार सैनिक व एक हल्लेखोर झाला. पिस्तुल्स आणि तलवारी घेतलेल्या शेकडो लोकांच्या जमावाने प्याऊंगपित मौंगद्वॉ गावात सैनिकांवर हल्ला केला. या गावात मुस्लीम रोहिंग्यांची मोठी वस्ती आहे. तौंग पैंग न्यॉर या खेड्यात चकमकीत सात जण ठार झाल्याची माहिती सैनिकांनी दिली होती. (वृत्तसंस्था)