600 भारतीय कामगारांचा कतारमध्ये छळ, पगाराविना ठेवले अडकवून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 06:21 PM2018-07-23T18:21:14+5:302018-07-23T18:21:45+5:30

2022 साली होत असलेल्या फूटबॉल विश्वचषकासाठी भारतातून गेलेल्या मजुरांना या भयानक त्रासातून जावे लागले आहे.

600 Indians in Qatar for 2022 Football World Cup infra stranded with no pay | 600 भारतीय कामगारांचा कतारमध्ये छळ, पगाराविना ठेवले अडकवून

600 भारतीय कामगारांचा कतारमध्ये छळ, पगाराविना ठेवले अडकवून

Next

दोहा- सुमारे 600 भारतीय मजुरांना कतारमध्ये अनेक प्रकारच्या त्रासाला आणि छळाला सामोरे जावे लागले आहे. सहा महिने पगार नसणे, नोकरीवरुन काढून टाकणे, व्हीसा संपणे, कामगार वस्तीमध्ये योग्य सुविधांचा अभाव अशा प्रकारच्या अनेक संकटांना या लोकांना सामोरे जावे लागले आहे.

2022 साली होत असलेल्या फूटबॉल विश्वचषकासाठी भारतातून गेलेल्या मजुरांना या भयानक त्रासातून जावे लागले आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील 300 लोकांना इतरत्र नोकरी मिळाली आहे तर काही लोकांना भारतात परत आणले आहे. मात्र 8 ते 10 वर्षे कतारसाठी राबणाऱ्या या मजूरांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई कतारने दिलेली नाही. कतारमधील बांधकाम कंपनी एचकेएच जनरल कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीने 1200 मजूरांना काम दिले होते. आर्थिक संकटाचा या कंपनीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या कंपनीकडे काम करणाऱ्या मजूरांची स्थिती अत्यंत दयनीय झाली.

आम्हाला आता वाऱ्यावर सोडून दिलं आहे. इथल्या काही लोकांनी आमची दया येऊन अन्न दिलं तर आमचं चालतं. दिवसा आमच्या वाट्याला वीज येत नाही. रात्री जनरेटरचा उपयोग करता येतो. आम्हाला गेले सहा महिने पगार मिळालेला नाही असं केरळच्या एस. कुमार या कतारमध्ये आठ वर्षे काम करणाऱ्या मजूराने आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. या कंपनीत काम करणाऱ्या एका प्लंबरच्या व्हीसाची मुदत संपली आहे. तो म्हणतो मी आजारी पडल्यावर पकडला जाईन या भीतीने मी हॉस्पिटलमध्येही जाऊ शकत नाही. 25 कामगारांनी याबाबत भारतीय दुतावासाकडे आपल्याला पगार मिळालेला नसल्याचे कळवले. त्यानंतर भारतीय दुतावासाने हे कंपनीशी संपर्क केला मात्र त्याला कंपनीने अद्याप उत्तर पाठवलेले नाही.

Web Title: 600 Indians in Qatar for 2022 Football World Cup infra stranded with no pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.