गुहेत अडकलेल्या फूटबॉलपटूंच्या मदतीसाठी धावला एलन मस्क
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 12:45 PM2018-07-10T12:45:17+5:302018-07-10T12:50:43+5:30
थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या फूटबॉलपटूंच्या मदतीसाठी अमेरिकन अंतराळउद्योजक एलन मस्क धावला आहे. एलन मस्कने प्रोटोटाइप सबमरिनची मदत देऊ केली आहे.
बँकॉक- थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या फूटबॉलपटूंच्या मदतीसाठी अमेरिकन अंतराळउद्योजक एलन मस्क धावला आहे. एलन मस्कने 'प्रोटोटाइप सबमरिन'ची मदत देऊ केली आहे. या गुहेत अजूनही 5 मुले अडकलेली आहेत. 'मी आताच तीन नंबरच्या गुहेतून बाहेर आलो आहे' असे ट्वीट एलन मस्कने केले आहे.
Simulating maneuvering through a narrow passage pic.twitter.com/2z01Ut3vxJ
जर गरज पडली तर मिनीसब तयार आहे रॉकेटच्या सुट्या भागांपासून ते तयार करण्यात आले आहे. वाइल्ड बोअर या फूटबॉल संघावरुनच त्याचे नामकरण करण्यात आले आहे. त्याची गरज पडली तर वापरता यावे यासाठी मी तेथे येथेच ठेवत आहे असे एलन मस्कने जाहीर केले आहे.
इन्स्टाग्रामवरती एलनने पाण्याने भरलेल्या या गुहेतील व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. अजूनही आत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत. त्यांच्या मदतीसाठी एलनने मिनिसब देऊ केली आहे.'' एकावेळेस दोन पाणबुड्या व्यक्तींना घेऊन जाऊ शकेल आणि अत्यंत चिंचोळ्या जागेतून ती प्रवास करु शकेल'' असं एलनने स्पष्ट केलं आहे. ''आत बसलेल्या व्यक्तीला पोहणं आलंच पाहिजे असं नाही तसेच ऑक्सीजन कुप्यांचा वापर कसा करायचा हे माहिती नसलं तरी चालतं'' असं एलनने या मिनिसबची माहिती देताना सांगितले.
Just returned from Cave 3. Mini-sub is ready if needed. It is made of rocket parts & named Wild Boar after kids’ soccer team. Leaving here in case it may be useful in the future. Thailand is so beautiful. pic.twitter.com/EHNh8ydaTT
— Elon Musk (@elonmusk) July 9, 2018
नौदलाने डोंगराच्या कड्याचा भाग १00 ठिकाणी ड्रिल मशिनने खणण्याचे काम सुरू केले आहे. आतमध्ये अडकलेल्या सर्वांना प्राणवायूचा पुरवठा होत राहावा, यासाठी पाइपलाइन टाकून पूर्ण झाली आहे. त्यामुळे मुले व प्रशिक्षकांना श्वासोच्छवासात कोणतेही अडथळे आलेले नाहीत.
सध्या रशियात वर्ल्ड कप फुटबॉलचे सामने सुरू आहेत. फिफाच्या अध्यक्षांनी आत अडकलेल्या सर्व मुलांच्या सुटकेसाठी प्रार्थना करतानाच, सुटकेनंतर त्यांना अंतिम सामना पाहायला येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे ही मुले आनंदून गेली आहेत.
— Elon Musk (@elonmusk) July 8, 2018