मालकाने बेवारस सोडून दिल्याने कुत्रीने सोडला प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 04:20 AM2017-11-20T04:20:16+5:302017-11-20T04:20:33+5:30
मानसिक धक्का हा फक्त माणसांनाच बसतो, असे नाही तर जनावरांनाही तो सहन होत नाही.
मानसिक धक्का हा फक्त माणसांनाच बसतो, असे नाही तर जनावरांनाही तो सहन होत नाही. कुत्रीला तिच्या मालकाने महिनाभरापेक्षा जास्त दिवस विमानतळावर बेवारस सोडून दिल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे मानले जाते. कोलंबियातील बुकारामांगा विमानतळावर तिला मालक सोडून गेला होता. लोकांनी या कुत्रीचे नाव न्यूब व्हायेजेरा ठेवले. त्याचा अर्थ प्रवास करणारा ढग. तिला त्यांनी खाऊ घालण्याचा प्रयत्न केला व तिचा मालक परत येईल, असे त्यांना वाटले. परंतु ती खूपच दु:खी होती, त्यामुळे तिने खायचे जवळपास थांबवले होते. त्यामुळे तिची प्रकृती खालावली, असे शहरातील जनावरांच्या संरक्षणाचे काम करणाºया संस्थेच्या डॉक्टरांनी सांगितले. सुरुवातीच्या दिवसांत कुत्री विमानतळाच्या हॉलमधून फिरायची व ती लोकांकडे बघायची. बहुधा तिने आपला मालक कुठे दिसतोय का याचा शोध घेतला. वाट पाहण्यामुळे तिची प्रकृती खालावली व एक वेळ अशी आली की तिने खाणेच बंद केले.