म्हणून या देशात प्राणी चालवतात राजकीय सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 06:35 PM2017-11-03T18:35:24+5:302017-11-03T18:58:07+5:30
जगभरात अनेक देशात अशा निवडणूका घेतल्या जातात ज्यात उमेदवार हे प्राणी असतात.
मुंबई : लोकांवर सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी कितीतरी क्लुप्त्या वापरत असतात. मात्र प्रत्येकवेळी त्यांना यश येतंच असं नाही. सत्ता काबिज करण्यासाठी कितीतरी गोष्टींचा अवलंब केला जातो. पैशांचा पाऊस पाडावा लागतो, तरीही वर्षानुवर्षे कित्येकांना कोणतंच पद मिळत नाही. जगभरातील प्रत्येक देशात अशाच प्रकारचं राजकारण आहे. पण काही देशात विविध पातळीवर प्राणी सत्तेत असल्याचं तुम्हाला कोणी सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. कित्येक देशात कुत्री-मांजरी शहर चालवत आहेत. अशाच काही हटके शहरांविषयी आज आपण पाहुया.
ड्यूक
युनायडेट स्टेटमधल्या मिन्नेसोटा या शहरात ड्यूक हा ९ वर्षांचा कुत्रा तब्बल ३ वेळा महापौर म्हणून निवडून आल्याचं तेथील सोशल मीडिया सांगते. मिन्नेसोटा या शहरातील कोरमरंटमध्ये हा कुत्रा महापौर आहे. एका कुत्र्याची निवड महापौर पदासाठी झाली तरी तेथील एकाही नागरिकाने याला विरोध केलेला नाही.
स्टब्स
युनायटेड स्टेटमधील अलास्कामधील टॅल्कीना या गावात गेल्या पंधरा वर्षांपासून एक मांजर राज्य करते आहे. स्टब्स असं त्या मांजरीचं नाव असून १९९७ सालापासून ही मांजर पर्यटकांसाठीही आकर्षणाचा विषय ठरते आहे.
बोस्को
कॅलिफोर्नियामधील सुनोल येथे बोस्को नावाचा एका कुत्र्याने तीन उमेदवारांना हरवून सत्ता काबीज केली होती. १९८१ पासून ते १९९४ पर्यंत या कुत्र्याने महापौराची गादी चालवली. मात्र १९९४ साली त्याचा मृत्यू झाला. या कुत्र्याचा पुतळाही सुनोलमधील पोस्ट ऑफिसजवळ लावण्यात आला आहे.
पिगॉस
व्हिएतनाम वॉरचा निषेध करण्यासाठी राष्ट्रपतीपदासाठी युथ इंटरनॅशन पार्टीतर्फे एका डुक्कराला उमेदवारी देण्यात आली होती.
गिग्गल्स
मिशिगनमधील फ्लिंट येथे एक डुक्कर महापौर म्हणून निवडून आलं होतं. पण इतर नेत्यांप्रमाणेच त्याच्याकडून शहराच्या विकासासठी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक काम झालं नसल्याचे तेथील स्थानिक सांगतात.
ट्युक्सेडो स्टॅन
ट्यक्सेडो स्टॅन या मांजरी एका कॅनाडातील हॅलिफॅक्स येथील एका लेखकाने दत्तक घेतलं होतं. त्यानंतर या लेखकाने बेघर मांजरीसाठी एक संस्थाही स्थापन केली होती. त्यानंतर हेलिफॅक्स या गावात हे मांजर महापौरपदासाठी उभं राहिलं होतं. मात्र मांजर निवडून आलं नाही. पण तरीही हे मांजर त्या विभागत फार प्रसिद्ध आणि मान्यवरांपैकी एक आहे.
सौजन्य : www.dogwithblog.in