चीन-पाक कॉरिडॉरचा काश्मीर मुद्द्याशी थेट संबंध नाही- चीन
By admin | Published: April 18, 2017 05:39 PM2017-04-18T17:39:59+5:302017-04-18T17:39:59+5:30
भारताबाबत नेहमीच आक्रस्ताळी भूमिका घेणा-या चीननं पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 18 - भारताबाबत नेहमीच आक्रस्ताळी भूमिका घेणा-या चीननं पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. चीन-पाकिस्तान(सीपीईसी)च्या आर्थिक कॉरिडॉरचा काश्मीर मुद्द्याशी कोणताही थेट संबंध नसल्याचा खुलासा चीननं केला आहे. तसेच भारतानं वन बेल्ट-वन रोड (OBOR) या प्रकल्पात सहभागी व्हावं, असं आवाहन चीनचे राष्ट्रपती झी जिनपिंग यांनी केलं आहे. पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की आम्ही भारताचं वन बेल्ट-वन रोड प्रकल्पात नेहमीच स्वागत असेल, असंही झी जिनपिंग म्हणाले आहेत.
चीनचे OBOR या प्रोजेक्टसाठी 14 ते 15 मे रोजी समीट होणार आहे. OBOR हा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा स्वप्नवत प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चीनला यूरोपशी जोडण्याचा शी जिनपिंग यांचा मानस आहे. चीन-पाकिस्तान(सीपीईसी) हा आर्थिक कॉरिडॉरसुद्धा या प्रकल्पाचाच एक हिस्सा आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले, OBOR समीटमध्ये भारताचा कोणताही नेता उपस्थित राहणार नाही. मात्र भारताला पाहिजे असल्यास ते स्वतःचा प्रतिनिधी पाठवू शकतात. आम्ही भारताच्या प्रतिनिधी किंवा व्यावयासिक समुदाय सदस्याचं स्वागत करण्यासाठी तयार आहोत. OBOR या प्रोजेक्टच्या माध्यमातून सहभागी देशांचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. आम्हाला वाटतं भारतानं या प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊन महत्त्वाची भूमिका बजावावी. या OBOR या समीटमध्ये 28 देशांचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान सहभागी होणार आहेत. 46 अब्ज डॉलरच्या सीपीईसी या कॉरिडॉरचा भारताच्या राजनैतिक आणि काश्मीर सीमा वादाशी सरळ कोणताही संबंध नाही. या प्रकल्प फक्त आर्थिक सहकार आणि विकासासाठी आहे. काश्मीर मुद्द्यावर चीनच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. OBOR प्रोजेक्टमध्ये भारतानं सहभाग नोंदवल्यास यातून अनेक मार्ग खुले होणार आहेत. बांगलादेश, चीन, भारत आणि म्यानमार हे देश या समीटचाच भाग आहेत. त्यामुळे भारत यासाठी सकारात्मक भूमिका बजावू शकतो, असंही वांग म्हणाले आहेत.