फेसबूकवरील प्रायव्हसीला सुरुंग, तब्बल 87 मिलियन युझर्सचा डेटा केंब्रिज अॅनॅलिटिकाकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 04:40 AM2018-04-05T04:40:52+5:302018-04-05T04:40:52+5:30

सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असलेले फेसबूक डेटा चोरी प्रकरणामुळे वादात सापडले आहे. आता या प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा झाला असून...

Data on 87 mn Facebook users shared with Cambridge Analytica | फेसबूकवरील प्रायव्हसीला सुरुंग, तब्बल 87 मिलियन युझर्सचा डेटा केंब्रिज अॅनॅलिटिकाकडे

फेसबूकवरील प्रायव्हसीला सुरुंग, तब्बल 87 मिलियन युझर्सचा डेटा केंब्रिज अॅनॅलिटिकाकडे

Next

लंडन - सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असलेले फेसबूक डेटा चोरी प्रकरणामुळे वादात सापडले आहे. आता या प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा झाला असून, सुमारे 87 मिलियन (म्हणजेच 8 कोटी 70 लाख) फेसबुक युझर्सचा डेटा केंब्रिज अॅनॅलिटिकाने गोळा केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुमारे 50 मिलियन युझर्सचा डेटा चोरण्यात आला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत होता.  खूप मोठा आहे. 
 फेसबूकचे चिफ टेक्नॉलॉजी ऑफीसर  माईक स्कूफर यांनी लिहिलेल्या ब्लॉगमधून ही माहिती समोर आली आहे. अॅप्लिकेशन्सद्वारे फेसबूकशी जोडले जाणारी त्रयस्त मंडळी युझर्सची माहिती चोरत असल्याचे द गार्डियनने म्हटले आहे.  दरम्यान, हे प्रकार रोखण्यासाठी फेसबूक युझर्सची वैयक्तिक माहिती अधियक सुरक्षित ठेवण्यासाठी काही बदल करणार आहे. या बदलांनुसार थर्ड पार्टी अॅपच्या डेव्हलपर्सना फेसबुक युझर्सच्या वॉलवरील माहितीचा अॅक्सेस मिळणार नाही.  




 फेसबुकवर डेटाचोरीच्या प्रकरणामुळे नामुष्कीची वेळ आली आहे. याप्रकरणामुळे नामांकित कंपन्या फेसबुकवरील आपले पेज डिलीट करत आहेत. टेस्ला, स्पेस एक्स, कॉमर्ज बॅंक आणि मोजला यासारख्या कंपन्यांनी  आपले फेसबुकवरील पेज डिलीट केले आहे. तसेच, अॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी फेसबुकला लोकांविषयींची माहिती सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.  तसेच, गूगलवर फेसबुकवरील आपले अकाउंट कशाप्रकारे डिलीट करावे, यासाठी मोठ्याप्रमाणात सर्च करण्यात येत आहे.   
दरम्यान, अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीवरुन आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू झाली आहे. फेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले असतानाच आणि त्याबद्दल फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली आहे. 

Web Title: Data on 87 mn Facebook users shared with Cambridge Analytica

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.