मगरीसारखे चालायचे डायनासोर

By Admin | Published: April 18, 2017 12:37 AM2017-04-18T00:37:45+5:302017-04-18T00:37:45+5:30

डायनासोरच्या अगदी प्रारंभीच्या पूर्वजांचे वैशिष्ट्ये आजच्या मगरीशी मिळतीजुळती होती, असे ‘नेचर’ या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधन निबंधात म्हटले आहे

Dinosaur Walking | मगरीसारखे चालायचे डायनासोर

मगरीसारखे चालायचे डायनासोर

googlenewsNext

डायनासोरच्या अगदी प्रारंभीच्या पूर्वजांचे वैशिष्ट्ये आजच्या मगरीशी मिळतीजुळती होती, असे ‘नेचर’ या विज्ञान नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधन निबंधात म्हटले आहे. डायनासोरचे पूर्वज मगरीसारखे दिसायचे, यावर अनेक जीवाश्म वैज्ञानिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यातील काहींचे म्हणणे, असे आहे की, डायनासोर दोन पायांवर चालायचे. ते काहीसे छोट्या डायनासोरसारखे दिसायचे, परंतु नव्या संशोधनात ज्या प्रकारच्या डायनासोरबद्दल उल्लेख आहे, ते चार पायांवर चालायचे. सात ते दहा फूट लांबीचा हा मांसाहारी प्राणी दक्षिण टांझानियात आजपासून २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्याही आधी लुप्त झाला. हे अगदी सुरुवातीचे डायनासोर होते. लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे प्रोफेसर पॉल बॅरेट यांचे म्हणणे असे आहे की, हे छोट्या आकाराचे डायनासोर होते. त्यांना आम्ही टेलियोकॅ्रटर म्हणतो, पण हे जास्त मोठे नव्हते. फार झाले तर त्यांचे वजन सरासरी कुत्र्याच्या वजनाएवढे असेल. या नव्या संशोधन प्रबंधाच्या लेखनाचे पॉल बॅरेट हे सहलेखक आहेत. ते बीबीसी रेडिओ फाइव्ह लाइव्हशी बोलताना म्हणाले की,‘ते कोमोडो ड्रॅगनपेक्षा थोडे मोठ्या आकाराचे दिसत होते.’ हा एक सडपातळ आणि दुबळा प्राणी होता. तो काही मगरीसारखा शक्तिशाली आणि क्रूर नव्हता. या डायनासोरच्या या प्रजातीशी संबंधित जीवाश्म पहिल्यांदा १९३३ मध्ये टांझानियात सापडले होते.१९५० च्या दशकात लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये या जीवाश्मावर अभ्यास केला गेला. टांझानियात २०१५ मध्ये नवे जीवाश्म मिळाले. त्यावरील संशोधनातून हे डायनासोर मगरीसारखे चालायचे हे स्पष्ट झाले.

Web Title: Dinosaur Walking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.