चाकूचा धाक दाखवत तरुणीने केला बॉयफ्रेंडवर बलात्कार, न्यायालयाकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 02:44 PM2017-09-22T14:44:36+5:302017-09-22T14:48:15+5:30

तरुणीवर आपल्याच बॉयफ्रेंडवर बलात्कार केल्याचा आरोप असून न्यायालय याप्रकरणी कारावासाची शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. जेव्हा लिस्टिना 17 वर्षांची होती, तेव्हा आपल्या 19 वर्षीय बॉयफ्रेंडवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

The girl stabbed the boyfriend, raped the boyfriend, and took serious note of the court | चाकूचा धाक दाखवत तरुणीने केला बॉयफ्रेंडवर बलात्कार, न्यायालयाकडून गंभीर दखल

चाकूचा धाक दाखवत तरुणीने केला बॉयफ्रेंडवर बलात्कार, न्यायालयाकडून गंभीर दखल

Next
ठळक मुद्देअमेरिकेमधील मिशिगन येथे तरुणीवर आपल्याच बॉयफ्रेंडवर बलात्कार केल्याचा आरोपलिस्टिना 17 वर्षांची होती, तेव्हा आपल्या 19 वर्षीय बॉयफ्रेंडवर बलात्कार केल्याचा आरोप आहेबॉयफ्रेंडच्या गाडीतच चाकूचा धाक दाखवत लिस्टिनाने बलात्कार केला होता

वॉशिंग्टन - अमेरिकेमधील मिशिगन येथे तरुणीवर आपल्याच बॉयफ्रेंडवर बलात्कार केल्याचा आरोप असून न्यायालय याप्रकरणी कारावासाची शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. लिस्टिना मेरी स्मिथ असं आरोपी तरुणीचं नाव आहे. जेव्हा लिस्टिना 17 वर्षांची होती, तेव्हा आपल्या 19 वर्षीय बॉयफ्रेंडवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. बॉयफ्रेंडच्या गाडीतच चाकूचा धाक दाखवत लिस्टिनाने बलात्कार केला होता. 

पीडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, 2016 रोजी दोघांनी एकमकेाला डेट करण्यास सुरुवात केली होती. यानंतर काही महिन्यातच दोघांमध्ये फिस्टकलं होतं. लिस्टिनाने हात उचलल्याने बॉयफ्रेंडला वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. 11 जानेवारी रोजी लिस्टिनाने आपल्यावर हल्ला केला होता असं पीडित तरुणाने सांगितलं आहे. 

पीडित तरुणाने दिलेल्या जबाबानुसार, लिस्टिनाने आधी त्याला भेटायला बोलावलं होतं. नंतर चाकूचा दाखवत ओरल सेक्स करण्यास सुरुवात केली. नंतर तिने त्याच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर संपुर्ण घटनेचं लिस्टिनाने व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं होतं. लिस्टिना स्मिथ आता 18 वर्षांची झाली आहे. लिस्टिनाला जन्मठेप होण्याची शक्यता होती, मात्र फिर्यादी पक्षाने लिस्टिनावर लावण्यात आलेले गंभीर आरोप मागे घेतले आहेत. लिस्टिना स्मिथच्या आईचं म्हणणं आहे की, 'माझी मुलगी हिंसक नाही आहे. तिने एखाद्यावर बलात्कार केला आहे यावर माझा विश्वास नाही'.

डॉमिनोज पिझ्झा शॉपमध्ये सेक्स करणं दांपत्याला पडलं महागात
ब्रिटनमधील ब्रिडलिंग्टन येथे डॉमिनोज पिझ्झा शॉपमध्ये सेक्स करणं एका दांपत्याला चांगलंच महाग पडलं आहे. जेव्हा हे दांपत्य सेक्स करत होतं, तेव्हा आजूबाजूला कोणीच उपस्थित नव्हतं. मात्र त्यांचं हे कृत्य तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. न्यायालयाने दांपत्याला सार्वजनिक ठिकाणी अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 17 ऑक्टोबर रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. 

डॅनिएला हर्स्ट आणि क्रेग स्मिथ यांचा व्हिडीओ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला. जवळपास 30 मिनिटे चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने 29 वर्षीय डॅनिएला हर्स्ट आणि 31 वर्षीय क्रेग स्मिथ यांना दोषी ठरवलं. सुनावणीदरम्यान न्यायालयात 18 मिनिटांचा हा व्हिडीओही पाहण्यात आला.  

Web Title: The girl stabbed the boyfriend, raped the boyfriend, and took serious note of the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.