हाफिज सईदच्या नजरकैदेत 30 दिवसांची वाढ, अन्य चौघांची नजरकैद वाढवण्यास न्यायालयाचा नकार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 10:30 PM2017-10-19T22:30:17+5:302017-10-19T22:30:34+5:30

मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे. लाहोर उच्च न्यायालयानं पाकिस्तान सरकारला हाफीजच्या नजरकैदेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हाफीजची नजरकैद 30 दिवसांनी वाढवली आहे.

Hafiz Saeed denies 30-day extension, detention of four others | हाफिज सईदच्या नजरकैदेत 30 दिवसांची वाढ, अन्य चौघांची नजरकैद वाढवण्यास न्यायालयाचा नकार 

हाफिज सईदच्या नजरकैदेत 30 दिवसांची वाढ, अन्य चौघांची नजरकैद वाढवण्यास न्यायालयाचा नकार 

Next

इस्लामाबाद- मुंबईतल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे. लाहोर उच्च न्यायालयानं पाकिस्तान सरकारला हाफीजच्या नजरकैदेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हाफीजची नजरकैद 30 दिवसांनी वाढवली आहे.

परंतु हाफीजचे साथीदार अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इक्बाल, अब्दुल रहमान आबिद आणि काझी काशिफ हुसेन यांना नजरकैदेत ठेवण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. जमात उद दावाचा म्होरक्या हाफीज सईदसह त्याचे साथीदार अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इक्बाल, अब्दुल रहमान आबिद व काझी काशिफ हुसेन यांना आज लाहोर उच्च न्यायालयात कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले होते. तेव्हा पंजाबमधील गृहविभागाच्या अधिकाऱ्यांनी हाफीज व इतर चौघांची नजरकैद तीन महिन्यांसाठी वाढववण्याची मागणी केली होती.

परंतु हाफीज सोडून इतरांची नजरकैद वाढवण्यास लाहोर उच्च न्यायालयानं नकार दिला. त्यामुळे आता हाफीज सईदची नजरकैद 24 ऑक्टोबरनंतर आणखी 30 दिवस वाढवली जाणार आहे. सईदची नजरकैद 30 दिवसांसाठी वाढवताना अन्य चौघांची नजरकैद वाढवण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. हाफीज सईदला दहशतवादविरोधी कलम 1997 अन्वये 31 जानेवारी रोजी 90 दिवसांची नजरकैद देण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपूर्वी कुख्यात दहशतवादी आणि 2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिझ सईद याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी यासंदर्भातील वृत्त प्रसारित केले होते. दरम्यान, हाफिझ सईदची दहशतवादी संघटना असलेल्या जमात उल दावाने हाफिझ सईदला नजरकैदेत ठेवण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद्यांविरोधात कडक पवित्रा घेतल्याने बदललेल्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीत आपण दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करत आहोत, हे दाखवण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

Web Title: Hafiz Saeed denies 30-day extension, detention of four others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.