'हाफिज सईदचा फायदा काहीच नाही, मात्र डोक्याला त्रास', पाकिस्तानी मंत्र्याने दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 04:02 PM2017-09-27T16:02:42+5:302017-09-27T16:03:18+5:30

दहशतवादी हाफिज सईद आणि लष्कर-ए-तोयबा आमच्यासाठी आणि दक्षिण आशियाई भागासाठी डोकेदुखी असल्याचं पाकिस्तानने मान्य केलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी न्यूयॉर्कमधील एशिया सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे.

'Hafiz Saeed does not have the advantage, but the headache', the Pakistani minister said confession | 'हाफिज सईदचा फायदा काहीच नाही, मात्र डोक्याला त्रास', पाकिस्तानी मंत्र्याने दिली कबुली

'हाफिज सईदचा फायदा काहीच नाही, मात्र डोक्याला त्रास', पाकिस्तानी मंत्र्याने दिली कबुली

Next

नवी दिल्ली - दहशतवादी हाफिज सईद आणि लष्कर-ए-तोयबा आमच्यासाठी आणि दक्षिण आशियाई भागासाठी डोकेदुखी असल्याचं पाकिस्तानने मान्य केलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी न्यूयॉर्कमधील एशिया सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे. मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा उल्लेख करताना ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं की, 'सध्या तो घरकैदेत आहेत. मात्र आम्हाला अजून कडक कारवाई केली पाहिजे हे मान्य करायला हवं. पाकिस्तानात असे अनेक लोक आहेत जे पाकिस्तानाच अडचणी असताना डोकेदुखी ठरु शकतात. या मताशी मी सहमत आहे'. 

यावेळी ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानला दहशतवादाला संपवण्यासाठी अजून प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही मान्य केलं. मात्र त्यासाठी अजून वेळ हवा असल्याचं त्यांनी सांगितलं. 'हाफिज सईद, लष्कर-ए-तोयबा आमच्यासाठी डोकेदुखी आहे, हे मला मान्य आहे. पण त्यांच्यापासून सुटका करुन घेण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. त्यांचा सामना करण्यासाठी सध्या आमच्याकडे ताकद नाही', असं ख्वाजा आसिफ यांनी सांगितलं. 

ख्वाजा आसिफ यांनी यावेळी हाफिज सईद आणि इतर दहशतवादी संघटना मोठ्या होण्यामागे अमेरिकाही तितकीच जबाबदार असल्याचं सांगितलं. 'हाफिज सईदसाठी उगाच आम्हाला दोष देऊ नका. 20 वर्षांपासून त्यांना आपल्या प्रिय लोकांप्रमाणे वागवत आहेत. व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्यासोबत बसून तुम्ही खाणं, पिणं केलं, आणि आता पाकिस्तानला दोष देता', असं ख्वाजा आसिफ बोलले आहेत. यावेळी अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या प्रॉक्सी वॉरला समर्थन देणं पाकिस्तानला खूपच महागात पडलं असल्याचं त्यांनी सांगितलं. 

आमची गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांना संरक्षण देते, पाकिस्तानी गुप्तचर अधिका-याचा धक्कादायक खुलासा
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या एका अधिका-यानं धक्कादायक खुलासा केला होता. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करत अधिका-यानं इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंतीही त्यानं न्यायालयाला केली. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे सहाय्यक उपनिरीक्षक मलिक मुख्तार अहमद शहजाद यांनी हे गंभीर आरोप केले होते. आयएसआयचे वरिष्ठ अधिकारी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. शहजाद यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत न्यायालयात याचिकाही दाखल केली. 

Web Title: 'Hafiz Saeed does not have the advantage, but the headache', the Pakistani minister said confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.