पायांची उंची ४५ इंच, सर्वात लांब पाय असलेली मॉडेल म्हणून डाँग लेई हिची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 04:32 AM2017-10-25T04:32:57+5:302017-10-25T04:33:02+5:30

चीनी लोक म्हणजे बुटके, नकट्या नाकाचे, गोल चेह-याचे असे चित्र आपल्यासमोर उभे राहते. अनेक चित्रपटांतही तसेच दाखवले जाते. एके काळी हे खरेही होते.

Height of feet 45 inches, the identity of Dong Lei as the model of the longest legs | पायांची उंची ४५ इंच, सर्वात लांब पाय असलेली मॉडेल म्हणून डाँग लेई हिची ओळख

पायांची उंची ४५ इंच, सर्वात लांब पाय असलेली मॉडेल म्हणून डाँग लेई हिची ओळख

googlenewsNext

चीनी लोक म्हणजे बुटके, नकट्या नाकाचे, गोल चेह-याचे असे चित्र आपल्यासमोर उभे राहते. अनेक चित्रपटांतही तसेच दाखवले जाते. एके काळी हे खरेही होते. चीनी लोक बुटकेच असायचे, पण आता त्यांची उंचीही वाढली आहे, वेगवेगळ्या चेह-याची ठेवण असलेले चीनी आता पाहायला मिळतात. आता ही मॉडेलच बघा. सर्वात लांब पाय असलेली मॉडेल म्हणून डाँग लेई हिची ओळख आहे. तिची उंची आहे सहा फूट. चीनमध्ये महिलांची उंची सरासरी पाच फूट दोन इंच आहे. त्यामुळे ही खूपच उंच, पण गंमत म्हणजे, तिच्या एकूण उंचीच्या ६0 टक्के भाग केवळ पायांचा आहे. तिच्या पायांची उंची आहे ४५ इंच. सात वर्षांच्या मुलाची जी उंची असते, तितके तिचे पाय आहेत. जगात तिच्याहून अधिक लांब पाय असलेल्या युवती आहेत. अमेरिकेतील दोन तरुणींच्या पायांची उंची अनुक्रमे ४७ व ४८ इंच आहे, तर रशियातील स्वेतलाना पॅन्क्रातोवा हिचे पाय आहेत ५२ इंच. गिनीज बुकमध्ये तिची नोंद झाली आहे.

Web Title: Height of feet 45 inches, the identity of Dong Lei as the model of the longest legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.