समलिंगी दाम्पत्यास भाडोत्री मातृत्वाने तिळे!

By admin | Published: August 23, 2016 05:15 AM2016-08-23T05:15:51+5:302016-08-23T05:15:51+5:30

क्रिस्टो आणि थिओ मेनेलाओऊ या दक्षिण आफ्रिकेतील एका समलिंगी पुरुष दाम्पत्यास भाडोत्री मातृत्त्वाने तिळी अपत्ये झाली

Homo sings to a lesbian couple! | समलिंगी दाम्पत्यास भाडोत्री मातृत्वाने तिळे!

समलिंगी दाम्पत्यास भाडोत्री मातृत्वाने तिळे!

Next


प्रिटोरिया (द. आफ्रिका) : क्रिस्टो आणि थिओ मेनेलाओऊ या दक्षिण आफ्रिकेतील एका समलिंगी पुरुष दाम्पत्यास भाडोत्री मातृत्त्वाने तिळी अपत्ये झाली आहेत. यापैकी एक मुलगा आहे व दोन हुबेहूब दिसणाऱ्या जुळ््या मुली आहेत. भाडोत्री मातृत्वाने अशा प्रकारे दोन जुळ््यांसह तिळे जन्माला येण्याची जगातील ही बहुधा पहिलीच घटना असावी, असे मानले जात आहे.
अणखी विशेष असे की, भाडोत्री मातेच्या गर्भधारणेसाठी क्रिस्टो आणि थिओ या दोघांच्याही ‘डीएनए’चा उपयोग केल्याने जन्माला आलेल्या या तिन्ही मुलांना या दोघांचे दुहेरी जैविक पितृत्व लाभले आहे.
भाडोत्री मातेने ३१ आठवड्यांच्या गरोदरपणानंतर येथील सनिंगहिल इस्पितळात या अपुऱ्या दिवसांच्या तीन बाळांना सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर जन्म दिला. २ जुलैला जन्म झाल्यापासून या तिन्ही बाळांचे जन्ममृत्यूच्या हिंदोळयांवर हेलकावे खाणे सुरु होते. परंतु चार आठवड्यांच्या शुश्रुषेनंतर ती तिघेही जगतील याची खात्री पटल्यावर डॉक्टरांनी त्यांच्या जन्माची माहिती आता जाहीर केली आहे. क्रिस्टो अणि थिओ या तिन्ही बाळांना घेऊन प्रिटोरियामधील आपल्या घरी परतले आहेत. या तिळ््यांमधील मुलाचे नाव त्यांनी जोशुआ असे ठेवले आहे तर दोन जुळ््या मुलींचे झो व केट असे नामकरण करण्यात आले आहे.
जोशुआ सर्वप्रथम जन्मला व जन्माच्या वेळी त्याचे वजन १.८२ किलो (४ पौंड) होते. त्यानंतर झो (१.४ किलो/३.१ पौंड) व केट (१.३ किलो/ २.९ पौंड) या दोन मुलींचा त्याच क्रमाने जन्म झाला. जन्माच्या वेळी ही मुले एवढी नाजूक व कमी वजनाची होती की सर्जन, नर्स आणि भूलतज्ज्ञांची मिळून २०हून अधिक जणांची टीम त्यांच्यावर सतत देखरेख करीत होती. त्यांची फुफ्फुसे एवढी नाजूक होती की त्यांना श्वासोश्वासाठी यंत्रे लावावी लागली. शिवाय झोच्या हृदयात व्यंग असल्याने ते दूर करण्यासाठी तिच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. थिओ तीन आठवडे या तिन्ही अपत्यांसोबत त्यांच्याच पलंगावर इस्पितळात झोपत असे. (वृत्तसंस्था)
>आपल्यालाही मूल व्हावे अशी इच्छा असली तरी समलिंगी वैवाहिक संबंधांतून ते शक्य नाही, याची खंत प्र्रत्येक समलिंगीच्या मनात सतत असते. तशी ती आम्हालाही होती. बरं मूल दत्तक घ्यावे म्हटले तर तेथे विषयलिंग दाम्पत्यांना प्राधान्य दिले जाते व आमचा नंबर लागलाच तर तो अगदी शेवटी लागणार, याचीही जाणीव झाली. सरोगसीचा एक आशेचा किरण दिसत होता. आमच्या मुलांना जन्माला घालणारी भाडोत्री आई आम्हाला मिळाली. हे सर्वच अघटित, अविश्वसनीय आहे.
-क्रिस्टो मेनेलाओऊ, तिळ््या मुलांचा पिता

Web Title: Homo sings to a lesbian couple!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.