काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील, UNमध्ये भारतानं पाकिस्तानला ठणकावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 07:40 AM2017-09-09T07:40:29+5:302017-09-09T10:01:36+5:30
काश्मीर हा भारताचाच अविभाज्य असा भाग आहे व कायम राहणार आणि पाकिस्ताननं ही बाब मान्य करावी, असं भारतानं पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.
नवी दिल्ली, दि. 9 - काश्मीर हा भारताचाच अविभाज्य असा हिस्सा आहे व तो कायम राहणार असून पाकिस्ताननंदेखील ही बाब मान्य करावी, असं भारतानं पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या परिचर्चेदरम्यान भारतीय राजनैतिक अधिकारी श्रीनिवास प्रसाद यांनी ही मुद्दा मांडला आहे. भारतीय राजनैतिक अधिकारी श्रीनिवास प्रसाद यांनी सांगितले की, ''मी आपल्या शेजारील देशाला आठवण करुन देतो की, जम्मू काश्मीर भारताच अविभाज्य भाग आहे आणि कायम राहील. शिवाय, पाकिस्ताननं ही बाब मान्य करावी. एक लोकशाही देश म्हणून भारत नेहमीच देशातील जनतेच्या इच्छेचा सन्मान करत आला आहे. दहशतवाद आणि दहशतवाद्यांमुळे या गोष्टीचा भारत देश अपमान होऊ देणार नाही''. प्रसाद पुढे असेही म्हणाले की, पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षेचं ठिकाण बनलं आहे, ही गोष्ट सर्वश्रुत आहे.
संयुक्त राष्ट्रमध्ये गुरुवारी झालेल्या एक चर्चेदरम्यान पाकिस्ताननं जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चांगल्याच शब्दांत ठणकावले आहे.
(सविस्तर वृत्त लवकर...)
Ironic, that our neighbor, Pakistan, well-known for providing safe havens to terrorists: India at UN 1/2
— ANI (@ANI) September 9, 2017
..and using terrorism as a tool of State policy has used this platform to yet again covet Indian territory: India at UN 2/2
— ANI (@ANI) September 9, 2017
May I remind our neighbor that J&K is & will remain an integral part of India. It is time that Pakistan too reconciles to this: India at UN
— ANI (@ANI) September 9, 2017