ओबामा दाम्पत्याच्या पुस्तकांचे हक्क सहा कोटी डॉलर्सना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2017 04:16 AM2017-03-02T04:16:30+5:302017-03-02T04:16:30+5:30
ओबामा व त्यांच्या पत्नी मिचेल त्यांच्या आठवणींवर आधारित दोन पुस्तके लिहिणार असून, मंगळवारी येथे झालेल्या लिलावात या पुस्तकांचे जागतिक प्रकाशन हक्क सहा कोटी डॉलर्सहून अधिक किंमतीला विकले
Next
लॉस एन्जल्स : जगातील सर्वात शक्तिशाली मानले गेलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सलग आठ वर्षे भूषवून निवृत्त झालेले बराक ओबामा व त्यांच्या पत्नी मिचेल त्यांच्या आठवणींवर आधारित दोन पुस्तके लिहिणार असून, मंगळवारी येथे झालेल्या लिलावात या पुस्तकांचे जागतिक प्रकाशन हक्क सहा कोटी डॉलर्सहून अधिक किंमतीला विकले गेले
पेंग्विन रँडम हाउस या प्रकाशन संस्थेने सर्वाधिक बोली लावली व हक्क त्यांना मिळाले, असे वृत्त ‘फिनान्शियल टाइम्स’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले. कोणत्याही माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनासाठी दिली गेलेली ही सर्वाधिक रक्कम आहे.