घरगुती गॅस सिलिंडरची किंमत वाढणार नाही तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान
By Admin | Published: June 13, 2014 06:28 PM2014-06-13T18:28:42+5:302014-06-13T18:28:42+5:30
पाटणा- घरगुती गॅस सिलिंडरची किंमत वाढणार नाही, तसेच प्रत्येक कुटुंबाला देण्यात येणारी सिलिंडरची संख्याही कायम राहील, असे केंद्रीय तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.
प टणा- घरगुती गॅस सिलिंडरची किंमत वाढणार नाही, तसेच प्रत्येक कुटुंबाला देण्यात येणारी सिलिंडरची संख्याही कायम राहील, असे केंद्रीय तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. नागरिकांना सध्या ज्या किमतीत गॅस मिळतो, त्याच किमतीत तो पुढेही मिळेल, यासंदर्भात नागरिकांवरील बोजा वाढणार नाही. तसेच आता जितके सिलिंडर मिळतात, तितकेच सिलिंडर यापुढेही दिले जातील असे प्रधान यांनी पत्रकारांना सांगितले. सिलिंडरवरील सबसिडी सरकार पूर्वीप्रमाणेच भरणार आहे, असे प्रधान म्हणाले. पेट्रोल व डिझेलच्या किमती हा मोठा मुद्दा असून, केंद्र सरकारचे त्याकडे बारकाईने लक्ष आहे. पेट्रोलच्या किमती २००६ सालीच नियंत्रणमुक्त करण्यात आल्या असून, डिझेल अद्याप सरकारी नियंत्रणात आहे. तेल व नैसर्गिक वायूचे देशातील उत्पादन वाढले पाहिजे. सरकार व गोरगरीब, तसेच शेतकरी यांच्यावर बोजा पडू नये असे प्रधान म्हणाले. प्रधान बिहारमधील तेल व नैसर्गिक वायूचा आढावा घेण्यासाठी बिहारमध्ये आले होते. तेथील तेल महामंडळाच्या अधिकार्यांना ते भेटले. बिहारमध्ये घरगुती गॅस भरण्याचे प्रमाण अगदी कमी प्रमाणात होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. बिहारमध्ये हे प्रमाण २६ टक्के असून, इतर राज्यात ते ४० ते ५० टक्के आहे.