पाकिस्तान जर दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान बनणार असेल तर परिणाम भोगावे लागतील - डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 07:39 AM2017-08-22T07:39:19+5:302017-08-22T09:19:22+5:30

दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान म्हणजे स्वर्ग आहे, असे टीकास्त्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोडले आहे.

Pakistan criticizes heaven, US President Donald Trumpk for terrorists | पाकिस्तान जर दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान बनणार असेल तर परिणाम भोगावे लागतील - डोनाल्ड ट्रम्प

पाकिस्तान जर दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान बनणार असेल तर परिणाम भोगावे लागतील - डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन, दि.22 -  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले आहे.  दहशतवाद्यांना पाकिस्तान अशाचप्रकारे आश्रय देत राहिल्यास अमेरिका शांत बसून राहणार नाही, असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांसाठी स्वर्ग असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. फोर्ट मायर या ठिकाणी अमेरिकन सैनिकांशी संवाद साधत असताना त्यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानसंदर्भात नव्या धोरणांची घोषणादेखील केली.  

गेल्या 16 वर्षांपासून अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून आहेत.  याठिकाणाहून सैन्याला माघारी बोलावण्यात आले तर यामुळे दहशतवादी कारवायांना अधिक गती मिळेल, असे ट्रम्प यांनी यावेळी सांगितले.
'पाकिस्तान दहशतवाद्यांचं आश्रयस्थान
पाकिस्तान नेहमी हिंसा पसरवणा-यांना, दहशतवाद्यांना आश्रय देत आला आहे.  अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेल्या 20 संघटना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सक्रिय आहेत.  पाकिस्तान जर अफगाणिस्तानातील आमच्या कारवाईला सहकार्य करणार असेल तर त्यांच्याकडे मिळवण्यासाठी असे बरेच काही असेल, मात्र पाकिस्तान जर दहशवाद्यांसाठी आश्रयस्थान बनणार असेल तर मात्र याचे परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा ट्रम्प यांनी यावेळी दिला. 







 

Web Title: Pakistan criticizes heaven, US President Donald Trumpk for terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.