भारतात नाही पण पाकिस्तानमध्ये 'पद्मावत'ला मिळालं 'U' सर्टिफिकेट, रिलीज होणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 11:59 AM2018-01-25T11:59:24+5:302018-01-25T13:39:07+5:30

पाकिस्तानानं 'पद्मावत' सिनेमाला यू सर्टिफिकेट देत सिनेमाच्या प्रदर्शनाला ग्रीन सिग्नल दिला आहे.

Pakistan has cleared Sanjay leela bhnasali Padmaavat with U certificate | भारतात नाही पण पाकिस्तानमध्ये 'पद्मावत'ला मिळालं 'U' सर्टिफिकेट, रिलीज होणार सिनेमा

भारतात नाही पण पाकिस्तानमध्ये 'पद्मावत'ला मिळालं 'U' सर्टिफिकेट, रिलीज होणार सिनेमा

Next

नवी दिल्ली -  संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला देशभरात करणी सेनेकडून तीव्र विरोध केला जात आहे. विरोधाच्या नावाखाली ठिकठिकाणी जाळपोळ व तोडफोड करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, शेजारील देश पाकिस्तानानं 'पद्मावत' सिनेमाला यू सर्टिफिकेट देत सिनेमाच्या प्रदर्शनाला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे भन्साळींचा पद्मावत पाकिस्तानातील सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे. 
आपल्या सेन्सॉन बोर्डनं सिनेमाला यू-ए सर्टिफिकेट दिलंय तर पाकिस्तानानं पद्मावतला यू सर्टिफिकेट दिले आहे.

एकीकडे पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदीची मागणी करण्यात येत असताना दुसरीकडे पाकिस्तानात सिनेमाच्या प्रदर्शनात कोणताही अडथळा आलेला नाही. भारतात 'पद्मावत' सिनेमातील व्यक्तीरेखा, गाणी, पेहराव, वेशभूषा या सर्वच गोष्टींवर आक्षेप नोंदवण्यात आला होता. सेन्सॉर बोर्डानं काही सूचना सुचवल्यानंतर सिनेमाच्या प्रदर्शनाला ग्रीन सिग्नल दिला होता. 

सिनेमातील 'घुमर' गाण्यामध्ये दीपिकाची कंबर दिसत असल्यानं यावरही आक्षेप नोंदवण्यात आला होता. इतिहासात छेडछाड केल्याचा आरोप करणी सेनेकडून करण्यात आला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यास राजपूतांच्या भावना दुखावल्या जातील, असे करणी सेनेनं म्हटले होते. या पार्श्वभूमीवर करणी सेनेने सिनेमाच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शनं करत जाळपोळ, तोडफोड केली. बुधवारी गुरुग्राम येथे शाळेच्या बसवरदेखील हल्ला केला होता. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी बसमध्ये विद्यार्थी व शाळेतील कर्मचारी होते. 
 

Web Title: Pakistan has cleared Sanjay leela bhnasali Padmaavat with U certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.