पृथ्वीच्या वजनाइतके प्लॅस्टिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:05 AM2017-07-29T04:05:45+5:302017-07-29T04:05:52+5:30
अमेरिकन शास्त्रज्ञांनी आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या प्लास्टिकचे वजन ८.३ अब्ज टन असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकन शास्त्रज्ञांनी आतापर्यंत तयार करण्यात आलेल्या प्लास्टिकचे वजन ८.३ अब्ज टन असल्याचे म्हटले आहे. प्लास्टिकची निर्मिती गेल्या ६५ वर्षांमध्ये अतिशय वेगाने झाली असून हे प्लास्टिक १०० कोटी हत्तींच्या वजनाएवढे आहे. विशेष म्हणजे प्लास्टिकला कचºयाच्या डब्यात टाकायच्या आधी त्याचा वापर फारच थोडा वेळ केला जातो. एकूण प्लास्टिक उत्पादनाचा ७० टक्के भाग हा कचºयाच्या रूपाने जातो व हा ७० टक्के भाग जमिनीत कचरा म्हणून भरती होत आहे, नाही तर नाल्यात फेकला जातो आहे. पर्यायाने पर्यावरणाची मोठीच हानी होत आहे. डॉ. रोलँड गेयेर यांनी बीसीसी न्यूजला सांगितले की, आपण खूप वेगाने प्लास्टिकचा ग्रह बनण्याच्या दिशेने प्रवास करीत आहोत. प्लास्टिकच्या वस्तुंच्या वापराचा आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. कॅलिफोर्निया युनिव्हरसिटीतील पर्यावरणतज्ज्ञ सँटा बार्बारा आणि त्यांच्या सहकाºयांनी लिहिलेल्या निबंधात आतापर्यंत बनवण्यात आलेले प्लास्टिक, त्याचा उपयोग आणि त्याचे दुष्पपरिणाम यांचा उल्लेख आहे.
आतापर्यंत बनवण्यात आलेले प्लास्टिक ८.३० अब्ज टन
यातील निम्मे प्लास्टिक गेल्या १३ वर्षांत तयार झाले
एकूण प्लास्टिकपैकी ३० टक्क्याचाच सध्या वापर होत आहे
फक्त ९ टक्के प्लास्टिकचाच वापरानंतर फेर वापर
७९ टक्के प्लास्टिक वापरानंतर फेकून दिले जाते
वापरानंतर १२ टक्के प्लास्टिक जाळले जाते
२०५० पर्यंत १२ अब्ज टन प्लास्टिक कचरा असेल असा अंदाज
रिसायकलचे प्रमाण- २०१४ : युरोप ३०, चीन २५ व अमेरिकेत ९ टक्के.