दुर्गा मुर्तीची घरवापसी, भारतातून चोरलेली मुर्ती अँजेला मर्केल परत करणार
By admin | Published: July 14, 2015 03:31 PM2015-07-14T15:31:37+5:302015-07-14T15:39:27+5:30
ऑक्टोबरमध्ये भारताच्या दौ-यावर येणा-या जर्मनीच्या चान्सलर अँजेल मर्केल या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतातून चोरलेली दुर्गामातेची मुर्ती भेट म्हणून देणार आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - ऑक्टोबरमध्ये भारताच्या दौ-यावर येणा-या जर्मनीच्या चान्सलर अँजेल मर्केल या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतातून चोरलेली दुर्गामातेची मुर्ती भेट म्हणून देणार आहेत. ही मुर्ती जर्मनीत सापडली असून पुरातत्व विभागाच्या अथक प्रयत्नानंतर ही मुर्ती पुन्हा एकदा परतणार आहे.
तामिळनाडू येथील प्राचीन देवीची मुर्ती भारतीय वंशाचे सुभाष कपूर यांनी चोरुन जर्मनीत विकली होती. सुभाष कपूर हे न्यूयॉर्कमध्ये कला दालन चालवायचे व या माध्यमातून भारतातून चोरुन आणलेल्या ऐतिहासिक व प्राचीन वस्तू ते परदेशात विकायचे. सुभाष कपूर यांना तामिळनाडू पोलिसांनी अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र भारतातून चोरलेली दुर्गा देवीची ऐतिहासिक मुर्ती जर्मनीतच होती. भारताच्या पुरातत्त्व खात्याच्या अधिका-यांनी जर्मनीला धाव घेत ही मुर्ती भारतातून चोरल्याचे पुरावे सादर केले. यानंतर दुर्गा देवीच्या या प्राचीन मुर्तीचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जर्मनीच्या चान्सेलर अँजेला मर्केल या ऑक्टोंबरमध्ये भारत दौ-यावर येणार आहेत. या दौ-यात ते मोदींना सुचिन्ह म्हणून ही मूर्ती देणार असल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.
सुभाष कपूर यांनी सिंगापूरमधील संग्रहालयालाही ३० प्राचीन व ऐतिहासिक वस्तू विकल्या असून त्या पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र सिंगापूरने या सर्व वस्तू भारताच्या असल्याचे पुरावे मागितले असून भारतीय अधिका-यांनी त्यांच्याकडेही पुरावे सादर केले आहेत.