पत्रकाराच्या गायब होण्यामागे सौदीचा हात असेल तर किंमत चुकवावी लागेल - ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 06:02 AM2018-10-14T06:02:18+5:302018-10-14T06:03:15+5:30
सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या अचानक गायब होण्यावरून आंतरराष्ट्रीय संबंध पुन्हा ताणले गेले आहेत.
वॉशिंग्टन : सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या अचानक गायब होण्यावरून आंतरराष्ट्रीय संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. खाशोगी यांच्या गायब होण्यामागे किंवा त्यांची हत्या झाल्यास सौदीला याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
खाशोगी 2 ऑक्टोंबरपासून इंस्तांबूलच्या दुतावासातून बेपत्ता झाले आहेत. ते वॉशिंग्टन पोस्टसाठी काम करतात. ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये संयुक्त राष्ट्र पत्रकार जमाल खाशोगी यांच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाच्या तळाशी जाईल, आणि त्यांच्या हत्येचे आदेश दिलेले असल्यास किंवा त्यांना काही बरेवाईट झाल्यास सौदी अरेबियाला मोठ्या शिक्षेस सामोरे जावे लागेल असा इशाराच त्यांनी दिला आहे.
सौदी अरेबियाचा या मागे हात असल्याचे आरोप ते फेटाळत असले तरीही खाशोगी यांच्या वाईटाला सौदीच जबाबदार राहणार आहे. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी तपास यंत्रणांना दिलेले पुरावे हे मुर्खपणाचे आहेत. यावरून या प्रकरणामागे काही काळेबेरे असल्याचे दिसते. सौदीच्या दुतावासाने खाशोगी हे कधीच दूतावास सोडून गेल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांची पत्नी हॅटीर सेंगिझ या दूतावासाबाहेर त्यांची खूप वेळ वाट पाहत होत्या. हे खूपच धक्कादायक असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.