Sri Lanka bomb blasts : श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आठवा बॉम्बस्फोट, संचारबंदी लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 03:32 PM2019-04-21T15:32:47+5:302019-04-21T17:58:24+5:30
श्रीलंकेत संध्याकाळी 6 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोलंबो येथे झालेल्या स्फोटांमुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
कोलंबो - श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल आठ ठिकाणी रविवारी (21 एप्रिल) साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर आता आणखी दोन बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. सातव्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर आठव्या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी सात जणांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.
श्रीलंकेत संध्याकाळी 6 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोलंबो येथे झालेल्या स्फोटांमुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 207 जणांचा मृत्यू झाला असून 450 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Reuters quoting police: Death toll from Sri Lanka's eight explosions rises to 207; 450 injured, seven people arrested pic.twitter.com/9FLwr4giAS
— ANI (@ANI) April 21, 2019
Colombo: People grieve after eight blasts struck various churches and hotels in #SriLanka today. pic.twitter.com/pTjiQFLXt2
— ANI (@ANI) April 21, 2019
AFP News Agency: Sri Lanka imposes 'temporary' social media ban after blasts. #SriLankaBlastshttps://t.co/LbvMGiKgUh
— ANI (@ANI) April 21, 2019
AFP news agency: Police say eighth Sri Lanka blast was suicide bomb, killed three. #SriLankaBlasts
— ANI (@ANI) April 21, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटांमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.
AFP news agency: Sri Lanka Defence Minister orders night curfew after blasts. #SriLankaBlastspic.twitter.com/dSngLbyTFu
— ANI (@ANI) April 21, 2019
#UPDATE AFP News Agency quoting police: Eighth blast hits Sri Lankan capital. https://t.co/MabzUBcVcU
— ANI (@ANI) April 21, 2019
ईस्टर संडे असल्याने चर्चमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 207 जणांचा मृत्यू झाला 450 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमी आणि मृतांमध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश अधिक असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
AFP News Agency quoting police spokesman, 'New blast in Sri Lankan capital, two dead.' pic.twitter.com/D1K6uS0lRV
— ANI (@ANI) April 21, 2019
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे' असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं आहे.
EAM Sushma Swaraj on multiple blasts in Srilanka: I am in constant touch with Indian High Commissioner in Colombo. We are keeping a close watch on the situation. (file pic) pic.twitter.com/vFZm1u8nky
— ANI (@ANI) April 21, 2019
श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या वृत्तामुळे भारतीय चिंतेत आहेत. श्रीलंकेतील कोलंबो शहरात राहणाऱ्या भारतीय नागरिक, तसेच भारतीय वंशाच्या लोकांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत या स्फोटात कोणत्याही भारतीयाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही. या पार्श्वभूमीवर आपण कोलंबोतील भारतीय दूतावासाशी सतत संपर्क ठेवून आहोत असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.
Minister of External Affairs, Sushma Swaraj: Indians in distress may please contact Indian High Commission in Colombo. We will provide you all assistance. @IndiainSL Our helpline numbers are: +94777903082,+94112422788,+94112422789, +94112422789. https://t.co/yS7RF2IIPC
— ANI (@ANI) April 21, 2019
कोलंबोतील परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून असल्याची माहिती देणारे ट्वीट भारतीय दूतावासाने देखील केले आहे. या ट्वीटमध्ये भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. कोलंबो आणि बट्टीकालोआमध्ये स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली असून आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Minister of External Affairs, Sushma Swaraj: There is an update from Colombo. There were three bomb blasts in Churches in Colombo, Negombo and Batticaloa. There have been three blasts in Shangrila, Cinnamon Grand Kingsbury hotels in Colombo. (File pic) pic.twitter.com/ZBiw3tsbuE
— ANI (@ANI) April 21, 2019
मदत किंवा इतर माहितीसाठी भारतीय नागरिकांना संपर्क करता यावा साठी क्रमांकही देण्यात आले आहेत. +94777903082,+94112422788,+94112422789, +94112422789 हे संपरेक क्रमांक देण्यात आले आहेत तर श्रीलंकेतील संपर्क क्रमांकाव्यतिरिक्त+94777902082 +94772234176 या क्रमांकावरही भारतीय संपर्क करू शकतात.
In addition to the numbers given below, Indian citizens in need of assistance or help and for seeking clarification may also call the following numbers +94777902082 +94772234176
— India in Sri Lanka (@IndiainSL) April 21, 2019
Explosions have been reported in Colombo and Batticaloa today. We are closely monitoring the situation. Indian citizens in need of assistance or help and for seeking clarification may call the following numbers : +94777903082 +94112422788 +94112422789
— India in Sri Lanka (@IndiainSL) April 21, 2019
इस्टर संडेला श्रीलंका हादरली; बॉम्बस्फोटांची तीव्रता फोटोंमधूनhttps://t.co/P9U7RuZscd#SriLanka#bombBlast
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2019
कोलंबो हादरले; ईस्टर संडेला श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, 156 जणांचा मृत्यूhttps://t.co/6C3xP1wp3G#SriLankaBlasts
— Lokmat (@MiLOKMAT) April 21, 2019