'आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले', सुषमा स्वराजांनी पाकिस्तानला सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 09:32 PM2017-09-23T21:32:17+5:302017-09-23T21:48:22+5:30
आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा सणसणीत शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीचत बोलताना सुषमा स्वराजांनी सडेतोड भाषण करत पाकिस्तानला एकामागोमाग एक चपराक लगावल्या.
न्यू यॉर्क - आम्ही वैज्ञानिक तयार केले, तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा सणसणीत शब्दांत केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत बोलताना सुषमा स्वराजांनी सडेतोड भाषण करत पाकिस्तानला एकामागोमाग एक चपराक लगावल्या. यावेळी त्यांनी भारतावर आरोप करणा-या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांना ज्या देशाने दहशतवाद आणि हिंसेच्या सर्व सीमा पार केल्या आहेत तो देश आम्हाला अहिंसा आणि मानवता शिकवत होता असा टोला लगावला.
आम्ही गरिबीशी लढत आहोत, पण पाकिस्तान आमच्याशी लढत आहे असं सांगत सुषमा स्वराजांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. यावेळी त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी यांचं भाषण सुरु असताना प्रत्येकजण 'कोण बोलतंय ते पहा' (Look who is talking) असं बोलत होतं असा टोलाही लगावला.
Jis wakt wo bol rahe the, toh sunne waaley log keh rahe the "Look who is talking": EAM Sushma Swaraj pic.twitter.com/1bXjsytIDp
— ANI (@ANI) September 23, 2017
Jo mulk haivaaniyat ki haddein paar kar ke begunahon ko maut ke ghaat utarwata hai, wo yahan humein insaaniyat ka sabak sikha raha tha: EAM
— ANI (@ANI) September 23, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतकं सर्व होऊनही शांततेसाठी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण पुढे काय झालं ते सर्वांना माहित आहे अशी आठवण त्यांनी पाकिस्तानला करुन दिली. सोबतच पाकिस्तानला सर्व लक्षात आहे, पण विसरण्याचं नाटक करत असतात अशी टीका केली. 'भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाला, पण कधी तुम्ही एकत्र बसून विचार केला आहे का ? भारताने इतकी प्रगती केली पण दहशतवादी देश म्हणून आपली ओळख निर्माण का झाली हा विचार पाकिस्तानने कधी केला आहे का ? असा सवाल सुषमा स्वराजांनी विचारला.
(Cont) what is beyond doubt is that PM Modi has, from the moment he took his oath of office, offered the hand of peace, and friendship: EAM pic.twitter.com/4KhE28bkrc
— ANI (@ANI) September 23, 2017
पाकिस्तानला तोंड देताना आम्ही देशाच्या विकासात कोणतीही हयगय केली नाही असं सुषमा स्वराजांना ठामपणे सांगितलं. आम्ही आयआयटी उभारले पण तुम्ही लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन, हक्कानी बनवलं. आम्ही वैज्ञानिक तयार केले, आणि तुम्ही दहशतवादी आणि जिहादी तयार केले अशा शब्दांत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावलं.
Humne IITs, IIMs, AIIMS banaye....par Pakistan walon aapne kya banaya? Lashkar-e-Taiba,Jaish-e-Mohammed, Haqqani network banaya: EAM pic.twitter.com/sx4GJkumP2
— ANI (@ANI) September 23, 2017
जो पैसा तुम्ही दहशतवाद्यांसाठी खर्च करत आहात तो पैसा देशाच्या नागरिकांसाठी वापरलात तर तुमच्या लोकांचं भलं होईल, त्यांचा विकास होईल असा सल्लाच सुषमा स्वराजांनी देऊन टाकला. यावेळी त्यांनी संयुक्त राष्ट्रांना दहशतवाद ही आपली प्रमुख समस्या आहे. त्याच्याविरोधात लढण्यासाठी आपण एकजूट झालो पाहिजे. वेगवेगळ्या नजरेने दहशतवादाकडे पाहणं थांबवलं पाहिजे असं आवाहनही केलं.
We produced scholars, doctors, engineers. What have you produced? You have produced terrorists: EAM Sushma Swaraj on Pakistan #UNGApic.twitter.com/v5LBmLBu2J
— ANI (@ANI) September 23, 2017
सर्वे संतू निरामयाः ही तर आमची संस्कृती
आम्ही केवळ आमच्याच सुखाचा आनंदाचा विचार करत नाही तर आमची संस्कृती सगळे जग सुखी व्हावे असा विचार करते असे सांगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या ७२ व्या आमसभेत वसुधैव कुटुंबकमची घोषणा केली.
EAM @SushmaSwaraj ends by reciting a verse:
— Raveesh Kumar (@MEAIndia) September 23, 2017
May all be happy;
May all be healthy;
May all see what is good;
May all be free from suffering. pic.twitter.com/L1v9n5we8D
A strong message was given by @SushmaSwaraj Ji on the dangers of terrorism and why we have to unite and fight this menace. #UNGA
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2017
आतापर्यंतच्या सर्व सरकारचा उल्लेख
सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणात मुद्रा योजना, उज्ज्वला योजना, जनधन योजना, स्टार्टअप इंडिया- स्टँडअप इंडिया, स्वच्छ भारत या मोदी सरकारच्या योजनांचा उल्लेख केला असला तरी पाकिस्तानला उत्तर देताना भारतातील अाजवरच्या विविध पक्षांच्या सरकारचा उल्लेख केला. विविध पक्षांची सरकारे भारतात आली तरी अंतर्गत विकासावरील लक्ष त्यांनी कमी केले नाही गेल्या सत्तर वर्षांमध्ये आम्ही आयआयटी, आयआयएम, एम्स, इस्रोसारख्या संस्था तयार केल्या असे सांगत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत म्हणून आम्ही एकत्रित प्रयत्न करतो असा संदेश सर्वांना दिला. गेली सत्तर वर्षे आम्ही गरिबीशी लढतोय असे सांगत आधीच्या सरकारांनाही त्यांनी त्यांच्या कामाची पोचपावती दिली.यामुळे भारतातही याचे चांगले परिणाम दिसण्याची शक्यता आहे.